४ महिन्याचं बाळ प्लेनमध्ये म्हणालं; 'मी रडलो किंवा ओरडलो तर माफ कराल!'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 12:39 PM2019-03-01T12:39:40+5:302019-03-01T12:45:27+5:30

सामान्यपणे जेव्हा आपण थिएटरमध्ये सिनेमा बघत असतो.... फ्लाइट, ट्रेन किंवा बसने प्रवास करत असतो तेव्हा अचानक एखाद्या लहान बाळाच्या रडण्याचा जोरजोरात आवाज येतो.

This mothers gesture for co passengers in a flight goes viral on social media | ४ महिन्याचं बाळ प्लेनमध्ये म्हणालं; 'मी रडलो किंवा ओरडलो तर माफ कराल!'

४ महिन्याचं बाळ प्लेनमध्ये म्हणालं; 'मी रडलो किंवा ओरडलो तर माफ कराल!'

Next

सामान्यपणे जेव्हा आपण थिएटरमध्ये सिनेमा बघत असतो....किंवा फ्लाइट, ट्रेन किंवा बसने प्रवास करत असतो तेव्हा अचानक एखाद्या लहान बाळाच्या रडण्याचा जोरजोरात आवाज येतो. या रडण्याच्या आवाजाने काही लोकांना त्रास होतो. पण त्या व्यक्तीला राग व्यक्त करता येत नाही. काय करणार शेवटी ते लहान बाळ असतं ना! 

पण एका आईने यावर एक फारचं भन्नाट आयडियाची कल्पना केली. ही महिला साउथ कोरियाहून सॅन फ्रॅन्सिस्कोला जात होती. सोबत होतं ४ महिन्यांच बाळ. या बाळाच्या रडण्याच्या आवाजाने लोकांना त्रास होऊ नये म्हणून तिने जे काही केलं, ते पाहून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत.

या प्लेनमध्ये २०० पेक्षा जास्त प्रवासी होते. बाळाचं नावं होतं Junwoo. त्याच्या आईने एक नोट लिहिली आणि प्रत्येक सीटवर लावली. त्यात लिहिले होते की, 'हॅलो...मी Junwoo आहे आणि मी ४ महिन्यांचा आहे. आज मी माझ्या आई आणि आज्जीसोबत मावशीला भेटायला अमेरिकेला जात आहे. मी जरा घाबरलेलो आहे, कारण हा माझा फ्लाइटने पहिलाच प्रवास आहे. त्यामुळे रडू शकतो आणि ओरडूही शकतो. मी शांत राहण्याच पूर्ण प्रयत्न करेन, पण नक्की सांगता येणार नाही. माफ करा. माझ्या आईने तुमच्यासाठी एक छोटंसं पॅकेट तयार केलं आहे. यात काही कॅंडीज आणि इअरप्लग्स आहेत. जर मी जास्त आरडाओरड केली, तर तुम्ही याचा वापर करा. प्रवासाचा आनंद घ्या. धन्यवाद!'.

मजेदार बाब म्हणजे या प्लेनमध्ये प्रवास करणाऱ्या Dave Corona यांनी सांगितले की, बाळाने जराही आवाज केला नाही. मात्र हे नक्की की, त्याची आई फारच समजदार होती. माझी आई असती तर थेट भांडायला गेली असते. 

Web Title: This mothers gesture for co passengers in a flight goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.