ती आई होती म्हणुनी! घरी झोपलेल्या बाळाचा गुदमरत होता श्वास, ऑफिसमध्ये बसलेल्या आईने वाचला त्याचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 12:50 PM2021-08-30T12:50:21+5:302021-08-30T12:51:49+5:30

एक आई बाळाला पतीच्या भरोशावर ठेवून ऑफिसला गेली. जेव्हा तिने घरातील सीसीटीव्ही कॅमेरा मॉनिटर केला तर तिला धक्का बसला.

Mothers was in trouble to watch horror video of baby suffocating then saved his life | ती आई होती म्हणुनी! घरी झोपलेल्या बाळाचा गुदमरत होता श्वास, ऑफिसमध्ये बसलेल्या आईने वाचला त्याचा जीव

ती आई होती म्हणुनी! घरी झोपलेल्या बाळाचा गुदमरत होता श्वास, ऑफिसमध्ये बसलेल्या आईने वाचला त्याचा जीव

Next


सोशल मीडियावर आपल्याला जगभरातील व्हायरल व्हिडीओ बघायला मिळतात. यातील काही व्हिडीओ मजेदार असतात तर काही हैराण करणारे असतात. असाच एक हैराण करणारा व्हिडीओ समोर आला आहे. यात एका आईच्या समजदारपणामुळे तिच्या बाळाचा जीव वाचला. ही घटना चीनच्या शांघायमधील आहे. इथे एक आई बाळाला पतीच्या भरोशावर ठेवून ऑफिसला गेली. जेव्हा तिने घरातील सीसीटीव्ही कॅमेरा मॉनिटर केला तर तिला धक्का बसला.

व्हायरल व्हिडीओमध्ये बघितलं गेलं की, एक बाळ झोपलेलं आहे. काही वेळाने चादरीने त्याचं तोंड झाकलं जातं आणि त्याचा श्वास गुदमरू लागतो. त्याचे वडिलही बाजूला गाढ झोपेत आहेत. त्यांना खबरही नाही की, बाळाचा जीव धोक्यात आहे. अशात बाळाची आई मोबाइलवर सीसीटीव्ही कॅमेरा मॉनिटर करून बाळाला बघते.

डेली स्टारमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, बाळ साधारण २ मिनिटे तोंडावर चादर आल्याने त्रासात होतं. जसं ते त्याच्या आईने पाहिलं तिने लगेच गाढ झोपेत असलेल्या पतीला फोन करून उठवलं. तेव्हा वडिलाने बाळाच्या तोंडावरची चादर काढली आणि बाळाला जवळ घेऊन पत्नीला विश्वास दिला की, बाळ आता ठीक आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ पाहून लोक महिलेचं भरभरून कौतुक करत आहे. तिने दूर असूनही आपल्या बाळाचा जीव वाचवला. तिचा पती गाढ झोपेत होता, ज्याला बाळाचा श्वास गुदरमतो हे माहितही नव्हतं. एका व्यक्तीने लिहिलं की, 'आई प्रेम अद्भूत असतं. ती आपल्या बाळावर तेव्हाही लक्ष देते जेव्हा ती कामात असते'. एका दुसऱ्या व्यक्तीने लिहिलं की, 'ही एक भीतीदायक घटना आहे. वडिलांना जबाबदारीची जाणीव नाही. जर आईने बाळाकडे लक्ष दिलं नसतं तर बाळाचा मृत्यूही झाला असता'.
 

Web Title: Mothers was in trouble to watch horror video of baby suffocating then saved his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.