बोलण्याच्या समस्येवर ‘मुद्रा’ स्मार्ट ग्लोव्ह
By admin | Published: July 22, 2016 03:16 AM2016-07-22T03:16:14+5:302016-07-22T03:16:14+5:30
अमृता स्कूल आॅफ इंजिनियरींगच्या अमृता रोबोटिक रिसर्च लॅब(एआरआरएल)च्या विद्यार्थ्यांनी ‘मुद्रा’ नावाच्या एका स्मार्ट ग्लोव्हची निर्मिती केली
मुंबई : अमृता स्कूल आॅफ इंजिनियरींगच्या अमृता रोबोटिक रिसर्च लॅब(एआरआरएल)च्या विद्यार्थ्यांनी ‘मुद्रा’ नावाच्या एका स्मार्ट ग्लोव्हची निर्मिती केली आहे, जो भारतीय साइन भाषेमधल्या हाताच्या हावभावांना इंग्रजी बोली भाषेमध्ये रुपांतरीत करुन बोलण्याची समस्या असलेल्या लोकांना इतरांसोबत प्रभावीपणे संवाद साधण्यास मदत करतो.
बी.टेक शाखेचे विद्यार्थी अभिजीत भास्करन, अनूप जी नायर, दीपक राम आणि क्रिश्नन अनंतनारायण यांनी एचआर नंदी वर्धन, सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट आॅफ इसीइ, अमृता स्कूल आॅफ इंजिनियरींग यांनी हे यश संपादन केले आहे.
एचआर नंदी वर्धन म्हणाले, हाताच्या भारतीय भाषेतल्या हावभावांना आवाजामध्ये रुपांतरीत करण्यासाठी ग्लोव्हची रचना करण्यात आली आहे. हा जरी आमचा प्राथमिक मुद्दा असला तरी हा ग्लोव्ह बहुउद्देशीय आहे. त्याला अशा अनेक अॅप्लिकेशन्ससाठी प्रोग्राम केले जाऊ शकते ज्यामध्ये मोशन सेन्सर टेक्नोलॉजी महत्वाची भूमिका पार पाडते. उदा. गेमिंग स्टेशन्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी, उपकरणांचा रिमोट कंट्रोल, रोबोटिक्स तसेच वैद्यकीय उद्योगामध्ये याचा उपयोग केला जाऊ शकतो. सोप्या आणि शक्तीमान अल्गोरिदममुळे ग्लोव्हला अतुलनीय क्षमता प्राप्त झाली आहे. मुद्रा ग्लोव्ह रायडिंग ग्लोव्हप्रमाणे सहज घालता येतो. फ्लेक्स रेसिस्टर, सेलेरोमीटर आणि गायरोस्कोपचा वापर करुन कोणत्याही दिशांना केलेले हावभाव यामार्फत ओळखता येऊ शकतात. त्याचे आऊटपूट इनबिल्ट स्पिकर्सच्या स्वरुपात दर्शवले जाते.
याविषयी, अभिजीत भास्करन हा विद्यार्थी म्हणाला, ‘प्रोटोटाइपला बनण्यास १६ आठवडे लागतात आणि तो रु. ७५०० मध्ये उपलब्ध आहे. हा ग्लोव्ह सध्या १ ते १० आकडे आणि मॉर्निंग, नाइट, गुडबाय, थँक्यू इतर भारतीय साइन लॅग्वेंजमधल्या शब्दांना समजू शकतो. तो प्रत्येक बोटाच्या स्थितीला समजू शकतो, ७० हावभाव कॉन्फिगर केले जाऊ शकतात. हाताची हालचाल हे आणखीन एक आव्हान होते. जरी इनर्शियल मेजरमेंट युनिट (आयएमयू) मूल्ये देत असले, तरी ते ध्वनीच्या स्वरूपात अचूक नव्हते, त्यामुळे अचूकतेसाठी फिल्टरिंग तंत्रांचा अवलंब करण्यात आला आणि हाताच्या ओरिएंटेशन आणि मूव्हमेंट्समध्ये फरक करणे सेन्सरला जड जात असल्यामुळे, विद्यार्थ्यांनी स्टेट इस्टिमेशनची नवीन पद्धत विकसित केली.
>२०११मध्ये घेतल्या गेलेल्या जनगणनेनुसार, १२ दशलक्ष भारतीयांना बोलण्याची किंवा ऐकण्याची समस्या आहे. त्यांना त्यांच्या दुर्बलतेमुळे स्वत:चे म्हणणे मांडताना अनेक अडचणी येतात. त्यांनी उपयोगात आणलेल्या साइन भाषेचा बरेचदा इतर लोक वेगळा अर्थ काढतात आणि त्यामुळे त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. अमृता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांद्वारे विकसित आलेला
मुद्रा स्मार्ट ग्लोव्ह ही दरी भरून काढण्यात सहयोग करेल.
- डॉ. टीएसबी सुदर्शन,
संशोधन प्रमुख, अमृता युनिवर्सिटी
>विद्यार्थ्यांनी कॅमेरा बेस्ड गेश्चर रेकग्निशनसोबत तयार करण्यात येणार होते आणि त्यामधून सध्याच्या ग्लोव्हची निर्मिती झाली, या उपकरणाला आॅन बोर्ड प्रोसेसिंग युनिटवर रिप्रोग्राम आणि रिकॉन्फिगर करता येऊ शकते. ३-डी स्पेसला ट्रॅक करण्यासाठी विद्यार्थ्यांद्वारे विकसित अल्गोरिदम अतिशय वेगळी असून, तिला रोबोटिक कॉन्फरन्समध्ये लवकर प्रकाशित केले जाणार आहे.