मुघलांच्या या राजकुमारीने केला होता मोठा त्याग, भावाचा जीव वाचवण्यासाठी वैऱ्यासोबत केलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 11:05 AM2023-09-18T11:05:12+5:302023-09-18T11:05:31+5:30
Mughal Harem Dark Secrets: या मुघल राजकुमारीने आपल्या भावाच्या वैरी राजासोबत लग्न केलं होतं आणि स्वत:ला त्याच्या हवाली केलं.
Mughal Harem Dark Secrets: मुघल साम्राज्याची (Mughal Empire) स्थापना भारतात बाबरने केली होती. पण एका युद्धात बाबरची स्थिती फार वाईट झाली होती आणि बाबरच्या सेनेला काही खायलाही मिळत नव्हतं. हे जवळपास सहा महिने असंच सुरू होतं. नंतर बाबरच्या बहिणीने मोठा त्याग करून मुघल बादशाहचा जीव वाचवला.
या मुघल राजकुमारीने आपल्या भावाच्या वैरी राजासोबत लग्न केलं होतं आणि स्वत:ला त्याच्या हवाली केलं. बाबरच्या या बहिणीचं नाव खानजादा बेगम होतं. खानजादा बेगमला मुघल इतिहासात सन्मानाचं स्थान देण्यात आलं आहे. कारण भावाचा जीव वाचवण्यासाठी तिने मोठा त्याग केला होता.
बाबर हरल होता
मुघल बादशाह बाबरचं युद्ध जेव्हा शायबानीसोबत झालं होतं तेव्हा बाबरला मोठा फटका बसला होता. बाबरच्या सेनेवर शायबानीची आर्मी वरचढ ठरली होती. शायबानीने बाबरच्या अनेक सैनिकांना बंदी बनवलं होतं. स्थिती इतकी वाईट होती की, बाबरच्या सैनिकांना खायलाही काही राहिलं नव्हतं. ते उपासमारीने मरत होते.
बाबरच्या बहिणीचा त्याग
सैनिकांची ही स्थिती पाहून बाबरची मोठी बहीण समोर आली आणि भावाचं राज्य वाचवण्यासाठी तिने स्वत:ला दुश्मनाच्या हवाली केली. बाबरनामामध्ये खानजादा बेगमला राजकीय रूपाने शक्तीशाली सांगितलं आहे. जेव्हा भावाला वाचवण्याची वेळ आली तेव्हा ती समोर आली. राज्य वाचवण्यासाठी तिने दुश्मन राजासोबत लग्न केलं.
शायबानीने ठेवल्या होत्या अटी
शायबानी खान याने खानजादा बेगमसमोर अट ठेवली होती की, जर ती त्याच्यासोबत लग्न करेल तर तो बाबरला सोडेल. ही अट पूर्ण करण्याचा अर्थ आपलं जीवन संपवणं होतं. पण तरीही खानजादा बेगमने भावासाठी त्याग केला आणि शायबानीसोबत लग्न केलं.