Mughal harem : अकबराच्या हरममध्ये होत्या 5 हजार महिला आणि किन्नरांकडून करून घ्यायचा हे काम, राण्यांवर होता संशय...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 10:01 AM2023-02-21T10:01:40+5:302023-02-21T10:01:59+5:30

Akbar harem dark secret: आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, इतक्या राण्या असूनीही तृतीयपंथी हरममध्ये का ठेवत होता? यामागे अकबराची आयडिया होती. चला जाणून घेऊ यामागचं कारण...

Mughal harem dark secrets five thousand women in Akbar harem kinner story | Mughal harem : अकबराच्या हरममध्ये होत्या 5 हजार महिला आणि किन्नरांकडून करून घ्यायचा हे काम, राण्यांवर होता संशय...

Mughal harem : अकबराच्या हरममध्ये होत्या 5 हजार महिला आणि किन्नरांकडून करून घ्यायचा हे काम, राण्यांवर होता संशय...

googlenewsNext

Akbar harem dark secret : मुघलांचा इतिहास तर तुम्ही नक्कीच वाचला असेल आणि त्यात बादशाह अकबरच्या शासनाबाबत वाचलं असेल. पण आज आम्ही तुम्हाला अकबराच्या हरमबाबत सांगणार आहोत. ज्याबाबत वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. तुम्ही तर नक्कीच वाचलं असेल की, अकबराच्या हरममध्ये 5 हजार महिला होत्या. पण तो सोबतच हरममध्ये तृतीयपंथींयांनाही ठेवत होता. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, इतक्या राण्या असूनीही तृतीयपंथी हरममध्ये का ठेवत होता? यामागे अकबराची आयडिया होती. चला जाणून घेऊ यामागचं कारण...

अकबराच्या हरममध्ये 5 हजारांपेक्षा जास्त महिला होत्या. पण त्यांच्यासोबतच काही तृतीयपंथीही होते. हे किन्नर अकबराचे फार विश्वासू होते. अशात तो हरममध्ये सैनिकांना ठेवत नव्हता. त्याजागी तो किन्नरांना सुरक्षा रक्षक म्हणून ठेवत होता. राण्यांसोबत काही महिलाही होत्या पण त्या फार शक्तीशाली मानल्या जात नव्हत्या. त्या हरमची सुरक्षा करू शकत नव्हत्या.

हरममध्ये ज्या महिला, किन्नर काम करत होते त्यांना पगारही दिला जात होता. मुख्य सैनिकाला 1 हजार रूपये महिना पगार दिला जात होता. जे नोकर होते, त्यांना कमी पगार दिला जात होता. इटालियन लेखक निकोलाओ यांनी लिहिलं आहे की, जेव्हा हरममध्ये कुणी आजारी पडत होतं तेव्हा हकीमला पूर्णपणे कव्हर करून आत नेलं जात होतं.

जॉन मार्शल (John Marshall) जे एक लेखक होते. त्यांनी लिहिलं आहे की, हकीम रूग्णाच्या पूर्ण शरीरावर रूमाल फिरवत होते. त्यानंतर हा रूमाल पाण्याच्या एका भांड्यात ठेवला जात होता. त्याच्या वासावरून आजाराची माहिती मिळत होती.

Web Title: Mughal harem dark secrets five thousand women in Akbar harem kinner story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.