1 कोटीचा पेंट, 12 लाखांची नंबर प्लेट, Mukesh Ambani यांच्या या कारची किंमत वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 11:37 AM2023-07-22T11:37:38+5:302023-07-22T11:39:42+5:30
Mukesh Ambani Cars : मुकेश अंबानी यांच्याकडे Rolls-Royce पासून ते Ferrari अशा अनेक कार आहेत. अंबानी परिवाराच्या गॅरेजमध्ये तशा तर 50 पेक्षा जास्त लक्झरी गाड्या आहेत.
Mukesh Ambani Cars : आशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) गेल्या बऱ्याच वर्षापासून देशातील सगळ्यात श्रीमंत उद्योगपती आहेत. मुकेश अंबानी आणि त्यांचा परिवार आपल्या लक्झरी लाइफस्टाईलमुळेही जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या घरापासून ते त्यांच्या लक्झरी गाड्यांची नेहमीच चर्चा होत असते. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या अनोख्या कारबाबत सांगणार आहोत.
मुकेश अंबानी यांच्याकडे Rolls-Royce पासून ते Ferrari अशा अनेक कार आहेत. अंबानी परिवाराच्या गॅरेजमध्ये तशा तर 50 पेक्षा जास्त लक्झरी गाड्या आहेत. पण Rolls-Royce Cullinan त्यांची सगळ्यात आवडती कार आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या याच कारबाबत सांगणार आहोत. ही कार भारतातील सगळ्यात महागडी कार मानली जाते. ही लक्झरी कार आपल्या पेंट जॉबमुळेही चर्चेत असते.
Cartoq च्या एका रिपोर्टनुसार, भारतात Rolls-Royce Cullinan ची किंमत 6.8 कोटी रूपयांपासून सुरू होते. पण 21 इंचाच्या टायरसोबत पेंट जॉब आणि इतर काही बदलांमुळे याची किंमत 13.14 कोटी रूपये झाली आहे. मुकेश अंबानी यांची टस्कन सन शेड असलेली ही Rolls-Royce Cullinan आपल्या पेंटमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. कारण या कारच्या पेंट जॉबसाठी 1 कोटी रूपये खर्च झाले आहेत.
अंबानी परिवाराच्या कारचे यूनिक सीरीज असलेले VIP Number त्याना इतरांपासून वेगळ्या ठरवतात. या नंबर प्लेट्ससाठी त्यांना लाखो रूपये खर्च करावा लागतो. मुकेश अंबानी यांची Rolls-Royce Cullinan केवळ आपल्या पेंट जॉबसाठीच नाही तर व्हिआयपी नंबरमुळेही प्रसिद्ध आहे. या कारचा रजिस्ट्रेशन नंबर ‘0001’ आहे. ज्यासाठी अंबानी यांनी RTO मध्ये 12 लाख रूपये भरले. मुकेश अंबानी यांनी ही कार मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटला साखरपुड्याला गिफ्ट दिली होती.
सामान्यपणे व्हिआयपी नंबरसाठी 4 लाख रूपये खर्च येतो. मुकेश अंबानी यांना जो नंबर हवा होता तो नसल्याने त्यांनी नव्या सीरीजमधून ‘0001’ हा नंबर निवडला. आरडीओने या नंबरच्या रजिस्ट्रेशनसाठी 12 लाख रूपये वसूल केले.