दिल्लीच्या आमदाराच्या दुप्पट आहे मुकेश अंबानी यांच्या शेफचा पगार, जाणून घ्या किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 09:45 AM2023-03-15T09:45:06+5:302023-03-15T09:46:50+5:30
Mukesh Ambani Chef : मुकेश अंबानी यांना असा आहार पसंत आहे ज्याला काही लोक सामान्य जेवण म्हणतात. एका सामान्य माणसाचा आहार जसे की, डाळ, चपाती, भात आणि एखादी भाजी. हा त्यांचा नियमित आहार आहे.
Mukesh Ambani Chef : भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखले जातात. ते लोकांमध्ये विनम्र आणि त्यांचे पाय जमिनीशी जुळले असल्याने लोकप्रिय आहेत. जेव्हा आहाराचा विषय येतो तेव्हा मुकेश अंबानी एक डेली रूटीनचं पालन करतात. हा साधेपणा बऱ्याच काळापासून त्यांच्या रूटीनचा भाग आहे. 70च्या दशकात जेव्हा मुकेश अंबानी स्टॅनफोर्ड विश्वविद्यालयात होते, तेव्हाही त्यांनी आपला शाकाहारी आहार कायम ठेवण्यासाठी पूर्ण कॅलिफोर्निया पिंजून काढलं होतं. अंडी व्यतिरिक्त अंबानी कोणत्याही मांसाचं सेवन करत नाहीत.
मुकेश अंबानी यांना असा आहार पसंत आहे ज्याला काही लोक सामान्य जेवण म्हणतात. एका सामान्य माणसाचा आहार जसे की, डाळ, चपाती, भात आणि एखादी भाजी. हा त्यांचा नियमित आहार आहे. अंबानी यांची जेवणाची सवय त्यांच्या गुणाचं एक उदाहरण आहे. मुकेश अंबानी यांनी थाई फूडही आवडतात. पण त्यांच्या परिवारात रविवारच्या ब्रंचमध्ये साउथ इंडियन फूड जसे की, इडली, डोसा आणि बरंच काही असतं.
किती मिळतो शेफला पगार
आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून मुकेश अंबानी हे रात्रीचं जेवण आपल्या परिवारासोबत करतात. हे त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी एकदा सांगितलं होतं. आता सगळ्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की, मुकेश अंबानी यांच्या शेफला पगार किती असेल? तर काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबानी यांचे शेफ इतर काही भत्त्यांसह महिन्याला 2 लाख रूपये पगार मिळवतात. मुकेश यांचे शेफ त्यांच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतात. मुकेश अंबानी हे त्यांच्या स्टाफ मेंबर्सना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. याआधी 2017 मध्ये त्यांच्या खाजगी ड्रायव्हरच्या वेतनाची माहिती समोर आली होती. त्यावेळ समोर आलं होतं की, मुकेश अंबानी यांच्या खाजगी ड्रायव्हरला महिन्याला 2 लाख रूपये पगार आहे.
आमदारांपेक्षा जास्त आहे शेफचं वेतन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅंटीलियामध्ये अंबानी यांच्या खाजगी शेफ्सना सुद्धा समान वेतन मिळतं. शेफना महिन्याला 2 लाख रूपये पगार मिळतो. त्याशिवाय त्यांना विमा आणि ट्यूशन फी सुद्धा दिली जाते. रिपोर्टमध्ये असाही दावा केला गेला आहे की, अॅंटीलियातील काही कर्मचारी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी परदेशात पाठवतात. अंबानी यांचा स्टाफ कमाईच्या बाबतीत दिल्लीच्या आमदारांपेक्षा एक पाउल पुढे आहे. कारण दिल्लीच्या आमदारांना महिन्याला 99,000 हजार रूपये वेतन मिळतं.