मुकेश अंबानींच्या घरी विजेचं बिल किती येतं? आकडा वाचून येईल चक्कर...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 02:35 PM2024-07-12T14:35:25+5:302024-07-12T14:36:44+5:30
अंबानी यांचं घर म्हणजे अॅंटिलिया किती मोठं आहे हे सगळ्यांनाच कदाचित माहीत असेल.
सध्या आशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची खूप चर्चा सुरू आहे. कारण त्यांचा लहान मुलगा अनंत अंबानी याचं लग्न सुरू आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या इव्हेंट्सचे कितीतरी व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अशात त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींचीही चर्चा समोर येत आहे.
अंबानी यांचं घर म्हणजे अॅंटिलिया किती मोठं आहे हे सगळ्यांनाच कदाचित माहीत असेल. २७ मजली इमारत, ५० लोक बसू शकतील इतकं थिएटर, ९ मोठ्या लिफ्ट्स, स्वीमिंग पूल, ३ हेलिपॅड आणि १६० कारचं पार्किंग इतका हा मोठा आवाका. तर ६०० पेक्षा जास्त इथे काम करतात. अशात या बिल्डींगचं बिल किती येत असेल? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. याचंच उत्तर आज जाणून घेऊ.
अॅंटिलिया इमारतीचा आवाका इतका मोठा आहे की, या इमारतीला हाय टेंशन कनेक्शन देण्यात आलं आहे. एका रिपोर्टनुसार अॅंटिलियामध्ये काम वीज सप्लाय करणाऱ्या स्टाफने सांगितलं की, येणाऱ्या दिवसात या घरात विजेचा वापर अधिक वाढणार आहे. एक रिपोर्टनुसार, जेवढा मुकेश अंबानी यांच्या घरात विजेचा वापर होतो तेवढ्यात मुंबईत राहणाऱ्या ७ हजार मध्यम वर्गीय लोकांची वीज होऊ शकते. अशात त्यांना बिल किती येत असेल?
अॅंटिलियामध्ये किती यूनिट वीज लागते?
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या अॅंटिलियामध्ये एका महिन्याला साधारण ६,३७, २४० यूनिट वीज जळते. या इमारतीलमधील सगळ्यात रूम्समध्ये भरपूर सुविधा आहेत. एका रूमसाठी सरासरी ३०० यूनिट वीज लागते. त्यात मुंबईतील साधारण ७ हजार मध्यम वर्गीय कुटुंबाना वीज पुरवली जाऊ शकते. ६,३७, २४० विजेसाठी मुकेश अंबानी यांना साधारण ७० लाख रूपये वीज बिल आलं होतं. वीज जमा केल्याने वीज विभागाकडून त्यांना ४८. ३५४ रूपये डिस्काउंटही देण्यात आला होता.
अॅंटिलिया बनवायचा खर्च
जगातील सगळ्यात महागडं घर अॅंटिलियाचं निर्माण २००४ मध्ये सुरू झालं होतं. यात २७ मजले असून इमारत पूर्ण व्हायला ६ वर्षाचा वेळ लागला होता. Antilia इमारत कोणत्याही महालापेक्षा कमी नाही. ही इमारत ४ लाख स्वेअर मीटरमध्ये तयार केली गेली आहे. एका रिपोर्टनुसार, ही इमारत बनवण्यासाठी साधारण १५००० कोटी रूपये खर्च लागला होता.
कर्मचाऱ्यांना किती मिळतो पगार?
एका रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या अॅंटिलियामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जवळपास २ लाख रूपये दर महिन्याला पगार मिळतो. घरातील प्लंबरला सुद्धा जवळपास १.५ ते २ लाख रूपये दर महिना पगार मिळतो. पगारासोबतच त्यांना वेगवेगळ्या सुविधाही मिळतात.