२३ व्या वर्षी 'ती' आहे ११ बाळांची आई; आता तिला शतक करण्याची घाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 04:45 PM2021-02-15T16:45:21+5:302021-02-15T16:48:48+5:30
जॉर्जियातल्या महिलेला मुलांची अतिशय आवड; सरोगसीच्या माध्यमातून व्हायचंय १०० मुलांची आई;
नवविवाहित जोडप्याला अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद आपल्याकडे दिला जातो. पण सध्याची एकंदर महागाई आणि इतर परिस्थितीचा विचार करून बरेच जण एक किंवा दोन अपत्यं झाल्यानंतर थांबण्याचा विचार करतात. पण जॉर्जियात वास्तव्यास असलेल्या एका महिलेला किमान १०० मुलं हवी आहेत. क्रिस्टियाना ओझ्तुर्क असं या महिलेचं नाव असून ती मूळची रशियाची आहे. सध्या क्रिस्टियानाला ११ मुलं असून तिचं वय २३ वर्षे आहे.
काय सांगता? 'या' पेट्रोलपंपावर मोफत पेट्रोल मिळणार; फक्त मुलांना म्हणावे लागणार १० श्लोक
क्रिस्टियानाला लहान मुलं अतिशय आवडतात. तिचा ५६ वर्षीय पती गॅलिप ओझ्तुर्कलादेखील लहान मुलांची अतिशय आवड आहे. त्यामुळे सरोगसीच्या माध्यमातून आणखी १०० मुलं जन्माला घालण्याचा ओझ्तुर्क दाम्पत्याचा विचार आहे. यासाठी त्यांना जवळपास ८ लाख युरो खर्च करावे लागतील. इतके पैसे खर्च करण्याची ओझ्तुर्क दाम्पत्याची तयारी आहे.
देव तारी त्याला कोण मारी! मशिनमध्ये हात अडकून दोन भाग झाले; अन् डॉक्टरांनी केला असा चमत्कार
सध्या मला एकूण ११ मुलं आहेत. गेल्या महिन्याच्या शेवटीच मी अकराव्या बाळाची आई झाले, असं क्रिस्टियाना यांनी एका स्थानिक माध्यमाशी बोलताना सांगितलं. 'सहा वर्षांपूर्वी मी माझ्या सर्वात मोठ्या मुलीला जन्म दिला. त्यानंतरची सर्व मुलं आम्हाला सरोगसीच्या माध्यमातून झाली आहेत,' असं क्रिस्टियाना म्हणाल्या. कोट्यधीश असलेल्या ओझ्तुर्क दाम्पत्यानं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर १०५ मुलांना जन्म द्यायचा असल्याची इच्छा बोलून दाखवली होती.
१०५ हा आकडा काही ठरवून सांगितलेला नाही. आम्ही नेमका आकडा निश्चित केलेला नाही. पण आम्ही फक्त ११ वर थांबणार नाही, असं क्रिस्टियाना म्हणाल्या. मूळच्या रशियाच्या असलेल्या क्रिस्टियाना सध्या जॉर्जियातल्या बतुमीत राहतात. जॉर्जियात सरोगसीच्या माध्यमातून पालक होणं कायदेशीर आहे. एका सरोगसीसाठी ८ हजार युरो इतका खर्च येतो. मॉस्कोत जन्मलेल्या क्रिस्टियाना आणि मूळचे तुर्कस्तानचे असलेल्या गॅलिप यांची भेट जॉर्जियामध्ये झाली. त्यावेळी क्रिस्टियाना यांना एक मुलगी होती. त्या एकट्याच तिचा सांभाळ करत होत्या.