याला म्हणतात नशीब! मुंबईतील परिवाराला परत मिळालं २२ वर्षाआधी गायब झालेलं ८ कोटींचं सोनं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 03:24 PM2022-01-13T15:24:57+5:302022-01-13T15:25:48+5:30
चोरी झालेल्या वस्तूंमध्ये राणी विक्टोरीयाचा फोटो असलेलं एक सोन्याचं नाणं, २ सोन्याच्या बांगड्या, १३०० ग्रॅम आणि २०० मिलीग्रॅम वजनाच्या दोन वस्तूंचा समावेश आहे. १३ वर्षाआधी संपूर्ण वस्तुंची किंमत १३ लाख रूपये होती.
(प्रातिनिधीक छायाचित्र)
कधी कुणाचं नशीब कसं चमकेल सांगता येत नाही. कधीही काहीही होऊ शकतं. रस्त्यावरील व्यक्ती महालात जाऊ शकतो तर महालातील रस्त्यावर येऊ शकतो. मुंबईतील एका परिवारासोबत असंच झालं. आहे. फॅशन ब्रॅन्ड Charagh Din च्या मालकाला २२ वर्षाआधी चोरी गेलेलं सोनं परत मिळालं आहे. या सोन्याची किंमत ८ कोटी रूपये इतकी आहे.
सत्र न्यायाधीश यू.जी.मोरे यांनी गेल्या ५ जानेवारीला सोनं राजू दस्वानी यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय सुनावली. चोरी झालेल्या वस्तूंमध्ये राणी विक्टोरीयाचा फोटो असलेलं एक सोन्याचं नाणं, २ सोन्याच्या बांगड्या, १३०० ग्रॅम आणि २०० मिलीग्रॅम वजनाच्या दोन वस्तूंचा समावेश आहे. १३ वर्षाआधी संपूर्ण वस्तुंची किंमत १३ लाख रूपये होती आआणि आता ती वाढून ८ कोटी रूपय झाली आहे. राजू दस्वानीने बिल जमा केल्यावर हे सिद्ध झालं की, ही प्रॉपर्टी त्यांच्या परिवाराची आहे.
न्यायाधीश म्हणाले की, 'या वस्तू खासकरून सोन्याच्या वस्तू पोलीस कस्टडीत ठेवण्याचा काही उपयोग नाही. १९ वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. फरार आरोपीलाही अजून पकडण्यात आलेलं नाही. जर एखाद्या तक्रारदाराला प्रॉपर्टी मिळवण्यासाठी इतकी वर्ष लागत असतील तर न्याय आणि कायदे व्यवस्थेची खिल्ली उडवण्यासारखं आहे'.
The Times of India च्या रिपोर्टनुसार, पब्लिक प्रोसीक्यूटर इकबाल सोलकर आणि कुलाबाचे पोलीस इन्स्पेक्टर संजय डोन्नर म्हणाले की, त्यांना सोनं परत करण्यात काहीच अडचण नाही.
८ मे १९९८ मध्ये कुलाबातील अर्जून दस्वानीच्या घरी एका गॅंगने सोन्याची चोरी केली होती. आरोपींनी सिक्युरिटी गार्डला मारहाण केली आणि सेफच्या चाव्या हिसकावून घेतल्या होत्या. यानंतर गॅंगने दस्वानी आणि त्यांच्या पत्नीला बांधलं आणि मग चोरी केली.
१९९८ मध्येच गॅंगमधील तीन आरोपींना पकडण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून चोरी केलेल्या काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या. ट्रायलनंतर १९९९ मध्ये तिघांना सोडून देण्यात आलं. तीन इतर आरोपी अजूनही फरार आहेत. २००७ मध्ये अर्जन दस्वानी यांचं निधन झालं.
राजू दस्वानीचे वकील म्हणाले की, कोर्टाचा हा आदेश ऐकून परिवाराला आनंद झाला. चोरी झालेल्या वस्तू त्यांच्या पूर्वजांच्या आहेत. परिवारातील सदस्यांचा भावना या वस्तूंसोबत जुळल्या आहेत. राजू दस्वानी आणि त्यांच्या दोन बहिणी या संपत्तीच्या कायदेशीर वारस आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या दोन्ही बहिणींनी आधीच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं आहे.