लग्नाआधी आईवडीलांनी ठेवली अजब अट; गोंधळलेल्या मुलीने थेट लोकांनाच विचारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 08:10 AM2023-10-06T08:10:36+5:302023-10-06T08:11:37+5:30

मुलीच्या आईवडीलांनी तिच्याकडेच केली मागणी

Mumbai girl advised to marry pot for husbands well being post viral social media | लग्नाआधी आईवडीलांनी ठेवली अजब अट; गोंधळलेल्या मुलीने थेट लोकांनाच विचारला सवाल

लग्नाआधी आईवडीलांनी ठेवली अजब अट; गोंधळलेल्या मुलीने थेट लोकांनाच विचारला सवाल

googlenewsNext

Trending Marriage Viral Post: भारत हा एक पारंपरिक विविधतेने नटलेला देश आहे. भारतात लग्नकार्य हा एक मोठा सोहळा मानला जातो. त्यामुळे भारतात अद्यापही लग्नसंस्थेला वरचे स्थान आहे. लग्नात अनेक विधी असतात. देशातील प्रत्येक राज्यात लग्नाच्या काही विशेष प्रथा असतात. काही ठिकाणी तर लग्नाच्या काही दिवस आधीदेखील अनेक विधी पार पाडावे लागतात. लग्नाआधीच्या अशाच एका विधीबाबतची एका मुलीची पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. तिच्या आईवडिलांनी तिला लग्नाआधी एक अजब प्रथा पार पाडायला सांगितली आहे. तिला हा प्रकार मान्य नाही. त्यामुळे तिने थेट लोकांनाच याबद्दलचा सवाल केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकार?

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये मुलीने लिहिले आहे की, मी मुंबईची मुलगी आहे. माझं वय २६ वर्षे आहे. माझं लग्न ठरवलं जात असून त्याआधी माझे आई-वडील मला एका मडक्याशी लग्न करायला सांगत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की मी लग्नाआधी मडक्याशी लग्न केलं तर, माझा होणारा नवरा दीर्घायु होईल आणि आमचे लग्न कधीच तुटणार नाही. मला या गोष्टींवर फारसा विश्वास नाही, पण मी तसे न केल्यास माझे आई-वडील नाराज होईल. मला माहिती आहे की ते माझ्यावर बळजबरी करणार नाहीत पण रोज घरी होणाऱ्या चर्चांमुळे मला मानसिक त्रास होतो. मी माझ्या शब्दावर ठाम राहण्याचे ठरवले आहे. पण ते सोपे कसे करता येईल यावर मला तुमचे मत हवे आहे.

ही पोस्ट व्हायरल झाल्यावर अनेकांनी ती शेअर केली. तसेच अनेकांनी त्यावर कमेंट्सदेखील केल्या आहेत. काहींनी तिला आईवडीलांचा मान राखण्यासाठी प्रथा करायला सांगितली आहे. तर काहींना ही बाब अजिबातच मान्य नसल्याने त्यांनी मुलीला आपल्या मतावर ठाम राहण्यास सांगितले आहे.

Web Title: Mumbai girl advised to marry pot for husbands well being post viral social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.