मुंबई पोलिसांवरही Pushpa फिवर; 'श्रीवल्ली' गाण्यावर दिला जबरदस्त परफॉर्मन्स, एकदा व्हिडीओ पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 09:04 AM2022-03-16T09:04:31+5:302022-03-16T09:05:21+5:30

पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्यानं अनेकांना भूरळ घातली आहे. मोठ्या क्रिकेटर्सपासून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सही (Social Media Influencers) या गाण्यावर थिरकले आहेत. आता मुंबई पोलिसांवरही पुष्पाचा फिवर दिसून येतोय. 

mumbai police band plays srivalli mumbai police band gave a scintillating performance on the song srivalli pushpa the rise | मुंबई पोलिसांवरही Pushpa फिवर; 'श्रीवल्ली' गाण्यावर दिला जबरदस्त परफॉर्मन्स, एकदा व्हिडीओ पाहाच

मुंबई पोलिसांवरही Pushpa फिवर; 'श्रीवल्ली' गाण्यावर दिला जबरदस्त परफॉर्मन्स, एकदा व्हिडीओ पाहाच

Next

साऊथ इंडियन चित्रपट पुष्पाच्या (Pushpa The Rise) श्रीवल्ली (Srivalli) या गाण्याची अनेकांमध्ये क्रेझ आहे. सोशल मीडियावर (Social Media) तर या गाण्यानं अक्षरश: धुमाकूल घातलाय. अनेक क्रिकेटर (Cricketers), सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स (Social Media Influencers) या गाण्यावर थिरकतानाचे व्हिडीओही आपण पाहिलेत. आता या गाण्याची क्रेझ मुंबई पोलिसांमध्येही असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये पोलीस पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स देताना दिसतायत.

मुंबई पोलिसांनी नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून श्रीवल्ली या गाण्याच्या जबरदस्त परफॉर्मन्सचा व्हिडीओ शेअर केलाय. तसंच याला त्यांनी हॅशटॅग 'खाकी स्टुडिओ.. रुकेगा नहीं' असं कॅप्शनही दिलंय. मुंबईकरांना श्रीवल्लीवर थिरकताना पहिलंय, आता यात आम्हीदेखील सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय, असंही त्यांनी म्हटलंय. 


अनेक नेटकऱ्यांना पोलिसांचा हा परफॉर्मन्स खुप आवडला आहे. मुंबई पोलिसांच्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या परफॉर्मन्सचं अनेकांकडून कौतुकही करण्यात येत आहे.

Web Title: mumbai police band plays srivalli mumbai police band gave a scintillating performance on the song srivalli pushpa the rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.