1974 मध्ये झाली होती तरूणीची हत्या, आता ५० वर्षानंतर टोपीमुळे सापडला मारेकरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 04:04 PM2024-11-11T16:04:40+5:302024-11-11T16:06:25+5:30

Crime News : आता तब्बल ५० वर्षांनंतर हत्या करणारी व्यक्ती पोलिसांच्या हाती लागली आहे. मात्र, दोषीचं वय आता ८४ वर्ष झालं आहे.

Murderer caught due to cap after 50 years in Chicago | 1974 मध्ये झाली होती तरूणीची हत्या, आता ५० वर्षानंतर टोपीमुळे सापडला मारेकरी!

1974 मध्ये झाली होती तरूणीची हत्या, आता ५० वर्षानंतर टोपीमुळे सापडला मारेकरी!

Crime News : अमेरिकेच्या शिगाकोमध्ये झालेल्या एका हत्येची धक्कादायक कहाणी समोर आली आहे. या हत्येची कहाणी सिनेमाच्या एखाद्या गूढ कथेसारखीच आहे. ही घटना १९७४ मधील आहे. एक तरूणी आर्ट शो मध्ये सहभागी होण्यासाठी शिकागोला जाते आणि रस्त्यातच तिची हत्या होते. अनेक वर्ष खूप प्रयत्न करूनही पोलीस दोषीला पकडू शकले नाही. अशात आता तब्बल ५० वर्षांनंतर हत्या करणारी व्यक्ती पोलिसांच्या हाती लागली आहे. मात्र, दोषीचं वय आता ८४ वर्ष झालं आहे. त्यामुळे त्याला किती दिवसांची शिक्षा होईल हे सांगता येत नाही.

न्यूयॉर्क पोस्ट वेबसाईटनुसार, १९७४ च्या फेब्रुवारी महिन्यात मेरी स्क्लाइस नावाची एक २५ वर्षीय तरूणी एका आर्ट शोमध्ये सहभागी होण्यासाठी विस्कॉन्सिनहून शिकागोला आली होती. रस्त्यात तिने काही लोकांना लिफ्ट मागितली. त्यानंतर सकाळी पोलिसांना तिचा मृतदेह आढळून आला होता. अनेक दिवस शोध घेऊनह मारेकरी पोलिसांना सापडला नव्हता.

५० वर्षानंतर सापडला मारेकरी

तरूणीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक टोपी आढळून आली होती. ज्यावर काही केसही होते. अलिकडेच डन काउंटी शेरिफ ऑफिसची टीम, न्यूजर्सीचे जेनेटिक जीनलॉजी डिपार्टमेंटच्या संपर्कात आली. त्यांनी केसांचा वापर करून एक जेनेटिक प्रोफाइल तयार केलं. याद्वारे संभावित मारेकऱ्याच्या पुन्हा शोध सुरू झाला. यादरम्यान पोलीस एका महिलेपर्यंत पोहोचली, तिच्या केसांचा डीएनए टोपीमध्ये असलेल्या व्यक्तीच्या केसांसोबत मॅच झाला होता. चौकशीतून समोर आली की, ही महिला त्याच मारेकऱ्याची मुलगी होती.

मारेकऱ्याने आधी दिला होता नकार...

पोलिसांनी याआधी सुरूवातीला तपासादरम्यान मारेकऱ्याची चौकशी केली होती. पण तेव्हा त्याने गुन्हा केला नसल्याचं सांगितलं होतं आणि सुटला होता. यादरम्यान ५० वर्ष तो आराम आपलं जीवन जगत होता. पण आता त्याच्या केसाचा डीएनए मॅच झाल्याने त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

दोषी व्यक्तीचं नाव मिलर आहे आणि तो मिनेसोडा इथे राहतो. अलिकडेच करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान त्याने सांगितलं की, त्याने मेरीला रोडवर पाहिलं आणि तिला लिफ्ट दिली होती. त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, पण तिने नकार दिला. त्यामुळे त्याने तिची हत्या केली होती. घटनास्थळाहून पळून जाताना टोपी तिथेच पडली होती. ज्यामुळे तो इतक्या वर्षांनी पकडला गेला.

Web Title: Murderer caught due to cap after 50 years in Chicago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.