घरात करावा लागणार नाही धूर; 'या' म्युझिक ट्रॅकमुळे डास पळतील दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 02:07 PM2019-04-04T14:07:49+5:302019-04-04T14:11:38+5:30
आपल्या सर्वांच्याच आयुष्यात म्युझिक म्हणजेच संगीत एक महत्त्वाची भूमिका निभावतं. असं कदाचितच कोणीतरी असेल की, त्याला म्यूझिक आवडत नाही. आनंद असो किंवा दुखः म्युझिक आपला खरा सोबती असतो.
आपल्या सर्वांच्याच आयुष्यात म्युझिक म्हणजेच संगीत एक महत्त्वाची भूमिका निभावतं. असं कदाचितच कोणीतरी असेल की, त्याला म्यूझिक आवडत नाही. आनंद असो किंवा दुखः म्युझिक आपला खरा सोबती असतो. कामाचा ताण किंवा आलेला कंटाळा घालवण्यासाठीही म्युझिक मदत करतं. एवढचं नाही तर एखाद्या गोष्टीमध्ये मन लागत नसेल किंवा एखाद्या कारणाने थेट तुमच्या हृदयावर आघात केला असल्यास संगीत त्यातून सावरण्यासाठी तुम्हला मदत करतं. परंतु आता याच संगीताच्या मदतीने तुम्ही डासांना दूर पळवून लावू शकता. हो..हो... तुम्ही बरोबर ऐकलं... डासांना दूर घालवण्यासाठी आणि डासांमुळे होणाऱ्या डेंग्यू, मलेरिया यांसारख्या जीवघेण्या आजारांपासून बचाव करण्यासाठी तुम्हाला म्युझिक मदत करणार आहे.
खरं तर काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या एका संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे. संशोधकांना संशोधनादरम्यान असं आढळून आलं की, डबस्टेप म्यूझिक (dubstep music) डासांपासून सुरक्षा देण्यासाठी मदत करतं. स्क्रिलॅक्सद्वारे कंपोज करण्यात आलेला डबस्टेप ट्रॅक 'स्केरी मॉनस्टर्स ऐंड नाइस स्प्राइट्स' (Skrillex - Scary Monsters And Nice Sprites) या म्युझिक ट्रॅकमध्ये हाय आणि लो अशा दोन्ही फ्रिक्वेंसी आहेत. हा ट्रॅक हे पाहण्यासाठी संशोधनामध्ये सहभागी करण्यात आला की, खरचं डासांना पळवून लावण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो का?
संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, मादा डासांवर या म्युझिक ट्रॅकचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून आले. इतर डासांच्या तुलनेत म्युझिक ट्रॅकचा परिणाम झालेल्या डासांनी उशीराने अटॅक केला. ज्यांच्यावर या म्युझिक ट्रॅकच्या सहाय्याने एक्सपरिमेंट करण्यात आलं नव्हतं त्यांनी म्युझिक प्ले केल्यानंतर अटॅक फार कमी केला.
दरम्यान, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, डास जगभरातील सर्वात घातक किटकांपैकी एक आहेत. ऑर्गनायझेशनने मलेरियाच्या विरोधात वैश्विक प्रगती हळूहळू कमी होत आहे. 2016मध्ये जवळपास 216 मिलियन लोकं या आजाराने संक्रमित होत असतात. ज्यांमध्ये 4 लाख 45 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. या लोकांमध्ये सर्वाधिक बालकं आणि लहान मुलांचा समावेश होता.
टिप : वरील गोष्टी या संशोधनातून सिद्ध झालेल्या असून आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. आम्ही केवळ माहिती म्हणून हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत.