रक्तापेक्षा मोठं मैत्रीचं नातं! कुटुंबियांनी फिरवली पाठ, ४०० किमी अंतराहून येऊन मुस्लिम मित्राने दिली मुखाग्नि!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 04:46 PM2021-04-28T16:46:07+5:302021-04-28T16:51:25+5:30
प्रयागराजच्या जयंतीपूर भागात हेम सिंह हे एकटे राहत होते. त्यांच्या मुलीचं आणि पत्नीचं निधन काही वर्षांआधीच झालं होतं
यूपीच्या इटावातील एक मुस्लिम व्यक्तीने हिंदू मित्रासोबत त्याच्या मृत्यूनंतरही मैत्री निभावली. या मित्राचं उदाहरण प्रत्येकजण देत आहे. हिंदू मित्राचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि नातेवाईकांनी पाठ फिरवली. तेव्हा मुस्लिम मित्र ४०० किलोमीटर अंतराहून आला आणि त्याने मित्राला मुखाग्नि देऊन अंत्यसंस्कार केला.
रिपोर्टनुसार, प्रयागराजच्या जयंतीपूर भागात हेम सिंह हे एकटे राहत होते. त्यांच्या मुलीचं आणि पत्नीचं निधन काही वर्षांआधीच झालं होतं. ते हायकोर्टात ज्वाइंट रजिस्ट्रार होते. एक आठवड्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी आपला मित्र सिराज यांना फोन करून कोरोना झाल्याची माहिती दिली. (हे पण वाचा : कडक सॅल्यूट! पडद्यामागचा एक असा हिरो ज्याने वर्षभरापासून पाहिला नाही मुलीचा चेहरा, म्हणाला - समाजाला माझी जास्त 'गरज')
तब्येत जास्त बिघडल्याने हेम सिंह यांना प्रयागराजच्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलने दोन लाख रूपये जमा करण्यास सांगितले होते. तेव्हा सिराज यांनी आपल्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर केले होते. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी हेम सिंह यांचं निधन झालं. (हे पण वाचा : कौतुकास्पद! हिंदू मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी एकत्र आले मुस्लिम बांधव, जवळच्या लोकांनी फिरवली पाठ!)
हेम सिंह यांच्या निधनाची माहिती मिळताच सिराज ४०० किमीचा प्रवास करून रात्री उशीरा तिथे पोहोचले. दुसऱ्या दिवशी सिराज यांनी एक एक करून हेम सिंह यांच्या २० नातेवाईकांना फोन केले. मात्र, कुणीही त्यांना खांदा देण्यासाठी तयार झाले नाही. त्यानंतर सिराज हे मित्र हेम सिंहचा मृतदेह घेऊन स्मशानभूमीत पोहोचले आणि त्यांनी अंत्यसंस्कार केले.
हेम सिंहचे जवळचे अधिवक्ता बशारत अली खान यांच्यानुसार, हेम सिंह यांचं लग्न माजी डीजीपी आनंद लाल बॅनर्जी यांच्या बहिणीसोबत झालं होतं. त्या सुद्धा हायकोर्टात असिस्ंटट रजिस्ट्रार होती. दीड वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं होतं.