आजही 'या' मिशीवाल्या राजकुमारीची होते चर्चा, १३ लोकांनी तिच्या प्रेमात केली होती आत्महत्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 02:31 PM2019-07-18T14:31:57+5:302019-07-18T14:42:50+5:30
आज सुंदरतेची परिभाषा केवळ सुंदर चेहरा, सडपातळ बांधा, चेहऱ्यावर डाग नसणे, केस लांब असणे अशी वेगवेगळी केली जाते.
आज सुंदरतेची परिभाषा केवळ सुंदर चेहरा, सडपातळ बांधा, चेहऱ्यावर डाग नसणे, केस लांब असणे अशी वेगवेगळी केली जाते. मात्र १९ व्या शतकात एक वेगळंच उदाहरण बघायला मिळालं होतं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, त्यावेळी लठ्ठपणाला हे सुंदरतेचं प्रतिक मानलं जात होतं. पर्शियन राजकुमारीचे किस्से याबाबतीत आजही ऐकायला मिळतात.
thehumornation.com वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, असे म्हणतात की, पर्शियन राजकुमारी ताल अल कजर सुल्तानाने सुंदरतेच्या सर्वच सीमांना तोडलं होतं. तिच्या चेहऱ्यावर दाट आयब्रो आणि तिला मिशाही होत्या. सोबतच ती फार लठ्ठही होती. पण त्यावेळी यालाच सुंदरता मानलं जातं होतं.
मीडिया रिपोर्टनुसार, त्यावेळी मोठ्या संख्येने असे तरूण होते, जे या राजकुमारीच्या सौंदर्याचे दिवाने होते आणि त्यांना तिच्याशी लग्न करायचं होतं. पण राजकुमारीने त्या सर्वांना नकार दिला होता. असेही म्हणतात की, राजकुमारीच्या नकारामुळे तब्बल १३ तरूणांनी आत्महत्या केली होती. तर काही रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ५ तरूणांची आत्महत्या केली होती.
या तरूणांचे प्रस्ताव नाकारण्याचं कारण म्हणजे राजकुमारीचं लग्न आधीच अमीर हुसैन खान शोजा ए सल्तनेहसोबत झालं होतं. या लग्नातून त्यांना ४ मुलेही होती. दोन मुली आणि दोन मुलं होती. पण नंतर त्यांचा घटस्फोट झाला होता.
असाही दावा केला जातो की, राजकुमारीचे अनेकांसोबत अफेअरही होते. ज्यातील दोन सर्वात प्रमुख होते. गुलाम अली खान अजीजी अल सुल्तान आणि इराणी कवी आरिफ काजविनीसोबत तिचं अफेअर असल्याचं बोललं जातं.
असे म्हणतात की, राजकुमारीला त्यावेळची सर्वात आधुनिक महिला मानलं जात होतं. त्यावेळी हिजाब न वापरणारी ती पहिली महिला मानली जात होती. तसेच ती पाश्चिमात्य संस्कृतीने फार प्रभावित होती आणि पाश्चिमात्य कपडेही परिधान करायची.