100 वर्ष जुन्या ड्रेसमध्ये सापडल्या होत्या काही नोट्स, रहस्य उलगडायला लागली 10 वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 11:35 AM2023-12-18T11:35:55+5:302023-12-18T11:36:16+5:30

ड्रेसच्या सीक्रेट पॉकेटमध्ये काही नोट्स सापडल्या होत्या. त्या हाताने लिहिलेल्या होत्या. पण त्यात काय लिहिलं होतं हे कुणाला समजत नव्हतं.

Mysterious handwritten notes found in 100 year old dress decoded after 10 years know story | 100 वर्ष जुन्या ड्रेसमध्ये सापडल्या होत्या काही नोट्स, रहस्य उलगडायला लागली 10 वर्ष

100 वर्ष जुन्या ड्रेसमध्ये सापडल्या होत्या काही नोट्स, रहस्य उलगडायला लागली 10 वर्ष

ब्राउन रंगाच्या एका 100 वर्ष जुन्या ड्रेसमध्ये काही नोट्स सापडल्या होत्या. या काहीतरी लिहिलेलं होतं. ते काय आहे हे समजून घेण्यासाठी 10 वर्ष लागली. आता यातील रहस्य जगासमोर आलं आहे. हा ड्रेस सिल्कचा आहे आणि 1880 च्या दशकातील आहे. उये ड्रेस 2013 मध्ये अमेरिकेच्या एका प्राचीन मॉलमध्ये सारा रिवर कोफील्डला मिळाला होता. त्या Digital Archaeological Record नावाची संस्था चालवतात. ड्रेसच्या सीक्रेट पॉकेटमध्ये काही नोट्स सापडल्या होत्या. त्या हाताने लिहिलेल्या होत्या. पण त्यात काय लिहिलं होतं हे कुणाला समजत नव्हतं.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, या शब्द असे लिहिले होते की, त्यांचा अर्थ समजत नव्हता. रिवर कोफील्ड यानी या नोट्स ऑनलाईन पोस्ट केल्या. जेणेकरून लोकांपैकी कुणीतरी यातील नोट्सचा अर्थ सांगू शकेल. काही लोकांनी त्यांना सांगितलं की, यावरील मेसेज कदाचित टेलीग्रामसाठी लिहिला गेला होता. त्यावेळी टेलीग्राम पाठवणं एक सामान्य बाब होती. पण त्याला लिहिलेल्या गोष्टीचा अर्थ अजूनही समजला नव्हता. त्यातील मेसेज 10 वर्ष रहस्य बनून राहिला. 

मॅनिटोबा यूनिवर्सिटीतील अभ्यास वेन चेन यांनी या नोट्समधील मेसेजचा अर्थ सांगितला आहे. ते म्हणाले की, यातील मेसेज तसाच आहे जसा वातावरणाची चर्चा करण्यासाठी अमेरिकन सेना सिग्नल द्वारे वापरल्या जाणाऱ्या कोडचे असतात. चेन यानी यासाठी 1892 मधील वातावरणाशी संबंधित टेलीग्राफ कोड बुकची मदत घेतली. हे पुस्तक मेरीलॅंडच्या एका लायब्ररीमध्ये ठेवलं आहे. यातून त्याना समजलं की, पुस्तकात हवामानाबाबत सांगण्यात आलं आहे. चेन यांना समजलं की, मेसेज सिग्नल सर्विस हवामान केंद्राकडून आला होता. जे अमेरिका आणि कॅनडात हवामानाबाबत कोडमध्ये टेलीग्राम पाठवत होते. मेसेजच्या प्रत्येक लाइनमध्ये हवामानासी संबंधित कोड आहेत.

यातील एका लाईनचं उदाहरण बघूया.  “Bismark, omit, leafage, buck, bank” यात Bismarck अमेरिकेच्या डकोटा क्षेत्रात आहे. जे आजचं नॉर्थ डकोटा आहे. omit ला हवेच्या तापमानाशी जोडलं आहे. leafage द्वारे दवबिंदू, buck ने हवामाची स्थिती आणि bank द्वारे वायुची गती सांगण्यात आली आहे. चेन यांनी हे शोधलं की, वातावरणाचं हे अवलोकन 27 मे 1888 ला करण्यात आलं होतं. तर ज्या महिलेने नोट्स पॉकेटमध्ये ठेवल्या होत्या, तिच्याबाबत काहीच माहिती मिळाली नाही.

Web Title: Mysterious handwritten notes found in 100 year old dress decoded after 10 years know story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.