१२५६ अब्ज रूपयांचा खजिना सापडणार? या २ ठिकाणीही आहे मोठा खजिना!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 03:10 PM2022-03-26T15:10:13+5:302022-03-26T15:11:02+5:30
फिनलॅंडच्या एका ग्रुपने हेलसिंकीमध्ये काही गुहांजवळ लेम्मिंकेनन खजिना शोधण्यासाठी ३४ वर्ष लावली. आता त्यांना वाटत आहे की, ते खजिन्याच्या फार जवळ आहेत.
एका खजिन्याचा शोध घेत असलेल्या काही लोकांचं मत आहे की, तो जगातील सर्वात बहुमूल्य सोनं, दागिने आणि जुन्या कलाकृतींचा खजिना (अंदाजे किंमत १,२५६ अब्ज रूपये) शोधण्याच्या फार जवळ आहेत. पण याबाबत एक समस्या आहे. ती ही की जोपर्यंत का खजिना मिळत नाही तोपर्यंत हे सांगता येणार नाही की, तिथे किती खजिना आहे आणि खरंच ते योग्य जागी पोहोचले की नाही.
फिनलॅंडच्या एका ग्रुपने हेलसिंकीमध्ये काही गुहांजवळ लेम्मिंकेनन खजिना शोधण्यासाठी ३४ वर्ष लावली. आता त्यांना वाटत आहे की, ते खजिन्याच्या फार जवळ आहेत. आणि मे महिन्यात ते पुन्हा खजिन्यासाठी खोदकाम सुरू करतील तेव्हा त्यांना या रहस्याबाबत समजेल. या खजिन्याच्या शोधादरम्यान आम्ही तुम्हाला जगातल्या ५ रहस्यमय खजिन्यांबाबत सांगणार आहोत.
डचमॅनचा सोन्याचा खजिना
ही खाण अमेरिकेच्या अॅरिझोनामध्ये आहे. ही १९व्या शतकात जर्मनीचा प्रवासी जॅकब वाल्ट्जने शोधली होती. यानंतर त्याने इथून सोनं काढलं आणि याबाबत कुणाला काही सांगितलं नाही. १८९१ मध्ये आपल्या मृत्यूवेळी त्याने त्याच्या शेजाऱ्याला खजिन्याबाबत सांगितलं होतं. जो अखेरच्या दिवसात त्याची सेवा करत होता. दरवर्षी हा खजिना शोधण्यासाठी लोक जातात. पण कुणालाही हा खजिना सापडलेला नाही.
नाइट्स टेम्पलरचा खजिना
नाइट्स टेम्पलर यूरोपमधील सर्वात फेमस धार्मिक मिल्ट्री अरेंजमेंट होती. ख्रिश्चनांच्या रक्षणांसाठी याची स्थापना १११९ मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडे खूप संपत्ती जमा झाली होती. पण १३०७ मध्ये फ्रेंज राजा फिलिप IV यांच्या वाढत्या शक्तीला घाबरला. त्याने सर्व नाइट्सला अटक केली आणि त्यांच्या खजिन्यावर हल्ला केला. पण खजिना रिकामा होता. त्याबाबत कुणाला काही माहीत नाही.