एक असा रहस्यमय खड्डा ज्यात काहीही टाका आपोआप येतं बाहेर, बुजवण्याचे कित्येक प्रयत्न फेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 12:21 PM2019-10-09T12:21:23+5:302019-10-09T12:28:18+5:30

इथे एक रहस्यमय खोल खड्डा आहे. ज्याबाबत असे सांगितले जाते की, हा खड्डा आजपर्यंत कधीही बुजवता आलेला नाही. आणि याचं कारणही अजब आहे.

Mysterious hole in Saudi Arabia which can not be filled up | एक असा रहस्यमय खड्डा ज्यात काहीही टाका आपोआप येतं बाहेर, बुजवण्याचे कित्येक प्रयत्न फेल!

एक असा रहस्यमय खड्डा ज्यात काहीही टाका आपोआप येतं बाहेर, बुजवण्याचे कित्येक प्रयत्न फेल!

googlenewsNext

जगभरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांबाबत जाणून घेतल्यावर लोकांना आश्चर्य तर वाटतंच, सोबतच ते विचारातही पडतात की असं कसं? असंच एक रहस्य सौदी अरबच्या उत्तरेत असलेल्या अल जॉफ प्रांतातील वाळवंटात आहे. इथे एक रहस्यमय खोल खड्डा आहे. ज्याबाबत असे सांगितले जाते की, हा खड्डा आजपर्यंत कधीही बुजवता आलेला नाही. आणि याचं कारणही अजब आहे.

काही वर्षांआधी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात दावा करण्यात आला होती की, या रहस्यमय खड्ड्यात काहीही टाकलं तरी ते आपोआप बाहेर येतं. व्हिडीओमध्ये याला निसर्गाची जादू असं म्हटलं गेलं होतं. 

या व्हिडीओत दाखवण्यात आलं होतं की, एका बुल्डोजरच्या मदतीने या खड्ड्यात माती टाकली जात आहे. पण माती आपोआप बाहेर येत आहे. साधारण १०० फूट उंचीचा वाळूचा फवारा निघतो आहे. त्यातून आत टाकलेली कोणतीही वस्तू बाहेर येते.

(Image Credit :  LiveLeak)

अल जॉफचा संपूर्ण वाळवंटाचा परिसर हा साधारण एक लाख २१२ वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. हे ठीकाण फार गरम राहतं. कारण इथे फारच कमी प्रमाणात पाऊस होतो. 

असे म्हटले जाते की, या रहस्यमय खड्ड्यात काहीही टाकलं तरी ते बाहेर येतं. कारण इथे ब्लोहोल्स तयार झालेले आहेत. मुळात वाळवंटात नेहमीच छोट्या-छोटया खड्ड्यांमध्ये ब्लोहोल्स तयार होतात. या खड्ड्यांना बुजवणं अशक्य असतं. या ब्लोहोल्सला नैसर्गिक व्हॅक्यूम असंही म्हटलं जातं.

वैज्ञानिकांनुसार, ब्लोहोल्स वातावरण, हवेचं तापमान आणि दबाव यावर अवलंबून असतं. जेव्हा एखाद्या खड्ड्यावर हवा पुढे निघून जाते, तेव्हा त्या हवेचं घनत्व तेच असतं जे खड्ड्यातील हवेचं असतं. यामुळे ब्लोहोल्सवर हवेचा प्रवाह थांबतो. जेव्हा बाहेरची हवा गरम होऊ लागते, तेव्हा खड्ड्याच्या आतील हवा वेगाने बाहेर येऊ लागते. हेच कारण आहे की, या खड्ड्यांमध्ये काहीही टाकलं तरी ते आपोआप बाहेर येतं.


Web Title: Mysterious hole in Saudi Arabia which can not be filled up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.