'या' रहस्यमय बेटावर जाण्यासाठी महिलांना आहे बंदी, पुरूषांसाठीही आहेत कठोर नियम!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 11:43 AM2019-09-05T11:43:03+5:302019-09-05T11:48:15+5:30

जगभरात अशी कितीतरी ठिकाणे आहेत, जी त्यांच्या वेगळेपणामुळे प्रसिद्ध असतात. एक असंच ठिकाण जपानमध्ये आहे.

Mysterious island of Japan Okinoshima Island where women are banned | 'या' रहस्यमय बेटावर जाण्यासाठी महिलांना आहे बंदी, पुरूषांसाठीही आहेत कठोर नियम!

'या' रहस्यमय बेटावर जाण्यासाठी महिलांना आहे बंदी, पुरूषांसाठीही आहेत कठोर नियम!

googlenewsNext

जगभरात अशी कितीतरी ठिकाणे आहेत, जी त्यांच्या वेगळेपणामुळे प्रसिद्ध असतात. एक असंच ठिकाण जपानमध्ये आहे. ओकिनोशिमा बेट असं या ठिकाणाचं नाव आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या बेटावर जाण्यासाठी महिलांना बंदी आहे. इतकेच नाही तर या बेटावर जाण्यासाठी पुरूषांसाठीही कठोर नियमही आहेत.

ओकिनोशिमा बेटाला यूनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज जाहीर केलं आहे. ७०० वर्ग मीटरमध्ये पसरलेल्या या बेटाबाबत म्हटलं जातं की, चौथ्या ते नवव्या शतकापर्यंत हे ठिकाण कोरिया प्रायद्वीप आणि चीन यांच्यात व्यापाराचं एक केंद्र होतं.

या बेटाला धार्मिक रूपाने फार पवित्र मानलं जातं. जुन्या काळापासून सुरू असलेली ही बंधने आजही या बेटावर पाळली जातात. ज्यातील एक म्हणजे इथे महिलांना येण्यास बंदी आहे.

असे म्हणतात की, या बेटावर जाणाऱ्या पुरूषांना निर्वस्त्र होऊ आंघोळ करणं गरजेचं असतं. तसेच येथील नियम इतके कठोर आहे की, इथे वर्षातून केवळ २०० पुरूषच येऊ शकतात. 

जे लोक या बेटावर जातात त्यांना ताकिद दिली जात की, त्यांनी तेथून कोणतीच वस्तू आणू नये. तसेच  इथे जात असल्याचंही कुणाला सांगू नये असंही त्यांना सांगितलं जातं. एका रिपोर्टनुसार, तेथून कुणी साधं गवतही सोबत आणू शकत नाही.

या बेटावर मुनाकाता ताइशा ओकित्सु मंदिर आहे. या मंदिरात समुद्राच्या देवीची पूजा केली जाते. १७ व्या शतकात इथे जहाजांच्या सुरक्षेसाठी पूजा केली जात होती.

Web Title: Mysterious island of Japan Okinoshima Island where women are banned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.