सतत येत राहतो 'या' विहिरीतून एक अनोखा प्रकाश, आजपर्यंत उलगडलं गेलं नाही रहस्य...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 04:33 PM2019-12-09T16:33:45+5:302019-12-09T16:48:34+5:30
जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जी आजही लोकांसाठी रहस्य बनून आहेत. असंच ठिकाण पोर्तुगालच्या सिन्तारामध्ये आहे. इथे एक रहस्यमय विहीर आहे.
(Image Credit : Social Media)
जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जी आजही लोकांसाठी रहस्य बनून आहेत. असंच ठिकाण पोर्तुगालच्या सिन्तारामध्ये आहे. इथे एक रहस्यमय विहीर आहे. या विहिरीतून सतत एक वेगळाच प्रकाश येत राहतो. आश्चर्याची बाब म्हणजे वैज्ञानिकही आजपर्यंत हे शोधू शकले नाही की, अखेर हा प्रकाश येतो कुठून.
या विहिरीला लोक 'विशिंग वेल' असंही म्हणतात. असे मानले जाते की, ही विहीर लोकांची प्रत्येत इच्छा पूर्ण करते. हेच कारण आहे की, या विहिरीत लोक नाणी टाकून इच्छा व्यक्ती करतात आणि त्यांचा यावर दृढ विश्वास आहे की, त्यांची इच्छा पूर्ण होणार.
सामान्यपणे कोणत्याही विहिरीचा वापर हा पाणी साठवण्यासाठी केला जातो. पण ही जगातली अशी विहीर आहे जिचा वापर धार्मिक दीक्षा संस्कारासाठी केला जात होता. पण ही विहीर कधी तयार करण्यात आली याचा काहीच पुरावा नाही.
या विहिरीचं सर्वात मोठं रहस्य हे आहे की, आत येणारा प्रकाश. कारण विहिरीत प्रकाश येण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नाहीये. मोठ-मोठ्या विद्वानांसोबतच वैज्ञानिकांनी हे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना हाती काही लागलं नाही.
या विहिरीची खोली चार मजली इमारतीच्या बरोबरीची आहे. असे मानले जाते की, या विहिरीत जेवढं आत जाल तेवढा आतील आकार निमुळता होत जातो. याच कारणांमुळे आजही ही विहीर लोकांसाठी रहस्य बनून आहे.