'याला' मानतात जगातला सर्वात रहस्यमय व्यक्ती, ज्याला होते दोन चेहरे, एक झोपायचा तर एक जागायचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 12:46 PM2019-09-02T12:46:34+5:302019-09-02T12:56:16+5:30

जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांचं रहस्य आजही अनेकांना कळू आणि समजू शकलं नाही. एक अशीच रहस्यमय व्यक्ती १९व्या शतकात इंग्लंडमध्ये राहत होती.

Mysterious person in the world Edward Mordake who had an extra face on the back of his head | 'याला' मानतात जगातला सर्वात रहस्यमय व्यक्ती, ज्याला होते दोन चेहरे, एक झोपायचा तर एक जागायचा!

'याला' मानतात जगातला सर्वात रहस्यमय व्यक्ती, ज्याला होते दोन चेहरे, एक झोपायचा तर एक जागायचा!

googlenewsNext

(Image Credit : Social Media)

जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांचं रहस्य आजही अनेकांना कळू आणि समजू शकलं नाही. एक अशीच रहस्यमय व्यक्ती १९व्या शतकात इंग्लंडमध्ये राहत होती. या व्यक्तीबाबत दावा केला जातो की, या व्यक्तीला दोन चेहरे होते. एक पुढे आणि एक मागे. ही जगातली अशाप्रकारची एकुलती एक व्यक्ती होती, ज्याला एक नाही तर दोन-दोन चेहरे होते.

(Image Credit : Social Media)

दोन चेहरे असलेल्या या व्यक्तीचं नाव होतं एडवर्ड मोरड्राके. असे म्हणतात की, एडवर्डचा दुसरा चेहरा सक्रीय नव्हता. पण जसाही तो झोपण्याचा प्रयत्न करत होता, त्याचा दुसरा चेहरा जागा होत होता. आणि रात्रभर जागा राहत होता.

(Image Credit : Social Media)

१९८५ मध्ये बॉस्टन पोस्टमध्ये एक लेख प्रकाशित झाला होता. ज्यात एडवर्डचा उल्लेख केला होता. त्यात लिहिलं होतं की, एडवर्ड त्याच्या दुसऱ्या चेहऱ्यामुळे तो फार वैतागलेला होता. कारण तो अनेक दिवस झोपूच शकत नव्हता.

(Image Credit : Social Media)

असेही म्हटले जाते की, एडवर्ड उपचारासाठी डॉक्टरांकडेही गेला होता. पण त्यावेळी टेक्नॉलॉजी फार विकसीत नव्हती. त्यामुळे उपचार शक्य झाले नाही. असेही म्हटले जाते की, डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला होता.

(Image Credit : Social Media)

या अनोख्या व्यक्तीबाबत असं सांगितलं जातं की, एडवर्डचा मागचा चेहरा हा एका मुलीचा चेहरा होता. या चेहऱ्याला डोळे तर होते, पण ते बघू शकत नव्हते. या चेहऱ्याला तोंडही होतं, पण त्याने खाता येत नव्हतं. हा चेहरा केवळ काहीतरी पुटपुटत राहत होता, तेही नरकाबाबत.

(Image Credit : Social Media)

असे म्हटले जाते की, एडवर्ड जेव्हा आनंदी व्हायचा तेव्हा त्याच्या दुसऱ्या चेहऱ्याला हे सहन होत नव्हतं. तसेच जेव्हा एडवर्ड रडत होता, तेव्हा त्याचा दुसरा चेहरा हसत असे. 

(Image Credit : Social Media)

त्यासोबतच आणखी एक सांगितलं जातं की, एडवर्डने त्याच्या दुसऱ्या चेहऱ्याला वैतागून आत्महत्या केली होती. त्यावेळी त्याचं वय केवळ ३७ वर्ष होतं. १८९६ च्या मेडिकल एनसायक्लोपिडियामध्ये एडवर्डच्या मेडिकल कंडिशनचा उल्लेख केला आहे. पण यावर आजही अनेक प्रश्न उपस्थित होतात. तर काही लोक याला केवळ कथा मानतात.

Web Title: Mysterious person in the world Edward Mordake who had an extra face on the back of his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.