खोदकामात सापडलं होतं 4000 वर्ष जुन अनोखं चक्र, आजही त्याच्या रहस्याहून उठला नाही पडदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 04:33 PM2020-04-19T16:33:00+5:302020-04-19T16:49:25+5:30

या चक्रावर लिहिलेला मजकूर वाचण्यात अद्याप कोणालाही यश आलेलं नाही.

Mysterious phaistos disc minoan palace of phaistos on the island of create myb | खोदकामात सापडलं होतं 4000 वर्ष जुन अनोखं चक्र, आजही त्याच्या रहस्याहून उठला नाही पडदा!

खोदकामात सापडलं होतं 4000 वर्ष जुन अनोखं चक्र, आजही त्याच्या रहस्याहून उठला नाही पडदा!

googlenewsNext

अनेकदा उत्खनन करत असताना अशा गोष्टी सापडतात. ज्यांचे रहस्य उलडणं कठीण असतं. ११२ वर्षांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. एका प्राचीन महालाच्या अवशेषांसाठी उत्खनन करत असताना पुरातत्व विभागाला एक रहस्यमय चक्र सापडलं होतं. हे चक्र पाहून सगळेच हैराण झाले होते. या चक्रावर लिहिलेला मजकूर वाचण्यात अद्याप कोणालाही यश आलेलं नाही. जगभरातील शास्त्रज्ञ या चक्रावरील भाषा वाचण्यात अपयशी ठरले. 

हे रहस्यमय चक्र फॅसटॉस डिस्टच्या नावाने ओळखलं जातं. कारण हे चक्र क्रीट टापू या ठिकाणी मिळालं होतं. जेव्हा तपासणीसाठी या चक्राचं कार्बन डेटींग केंलं. तेव्हा हे चक्र ४ हजार वर्ष जुनं असल्याचं निदर्शनास आलं. इटॅलियन पुरात्व विभागाचे लुइगी पर्निएर यांनी १९०८ मध्ये 'फॅसटॉस डिस्क' चा शोध  घ्यायला सुरूवात केली होती. 

त्यावेळी त्यांची संपूर्ण टीम खोदकाम करून  मिनोअन संस्कृतीच्या राजमहालाच्या अवशेषांचा शोध घेत होती. हा राजमहाल भूकंप किंवा ज्वालामुखीमध्ये कोसळला असावा अस तज्ञांचं मत आहे. या राजमहालाच्या तळघराला जेव्हा तोडण्यात आलं त्यावेळी एक मोठी खोली दिसून आली. या खोलीत खुप वस्तू इकडे तिकडे पसलेल्या होत्या.

त्यावेळी एक चक्राप्रमाणे वस्तू दिसून आली. या गोल चकतीवर चित्रलिपीमध्ये काहीतरी संदेश लिहीला होता. हा संदेश काय आहे. हे अद्याप समजलेलं नाही. सगळ्यात जास्त हैराण करणारी  गोष्ट म्हणजे १५ सेंटीमीटर व्यास असलेल्या या डिस्कमध्ये दोन्ही बाजूंनी रेषा आहेत. फॅसटॉस डिस्क एक जाळ्यात अडकवणारी धोकादायक वस्तू असावी, असं लुइगी पर्निएर याचं मत होतं. या चक्राबद्दल  आजही अनेक मतभेद आहेत. 

Web Title: Mysterious phaistos disc minoan palace of phaistos on the island of create myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.