आकाशातून पडतोय किड्यांचा पाऊस, लोक छत्री घेऊन निघत आहेत बाहेर; कुणालाच माहीत नाही रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 04:48 PM2023-03-09T16:48:38+5:302023-03-09T16:49:03+5:30

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, चीनची राजधानी बीजिंगमध्ये राहणाऱ्या लोकांसोबतची एक अजब घटना समोर आली आहे. राजधानीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आकाशातून किड्यांचा पाऊस पडला.

Mysterious rain storm of worms in China residents use umbrellas for protection | आकाशातून पडतोय किड्यांचा पाऊस, लोक छत्री घेऊन निघत आहेत बाहेर; कुणालाच माहीत नाही रहस्य!

आकाशातून पडतोय किड्यांचा पाऊस, लोक छत्री घेऊन निघत आहेत बाहेर; कुणालाच माहीत नाही रहस्य!

googlenewsNext

Mysterious rain storm of worms:  मनुष्याने विज्ञानाच्या माध्यमातून कितीही प्रगती केली तरी निसर्गासमोर त्यांना माघारच घ्यावी लागते. निसर्गाचे अनेक रहस्य आजही उलगडले गेलेले नाहीत. कधी आकाशातून पाण्याऐवजी धूळ, रेती, मासे पडू लागतात. ज्यामुळे लोक हैराण होतात. असंच काहीसं चीनची राजधानी बीजिंहमध्ये झालं.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, चीनची राजधानी बीजिंगमध्ये राहणाऱ्या लोकांसोबतची एक अजब घटना समोर आली आहे. राजधानीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आकाशातून किड्यांचा पाऊस पडला. सोशल मीडियावर या किड्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. किड्यांच्या हा नजारा पाहून कुणालाही झिणझिण्याच येतील.

El Heraldo च्या रिपोर्टनुसार, बीजिंगच्या नागरिकांना सूचना देण्यात आली आहे की, जर ते बाहेर निघाले तर त्यांनी सोबत छत्री ठेवावी. जे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत त्यात लोक छत्रीसोबत दिसत आहेत. हैराण करणारी बाब म्हणजे चीनी अधिकाऱ्यांना याबाबत काहीच कल्पना नाही आणि वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. काहीही असो पण या घाणेरड्या किड्यांमुळे लोकांचं जगणं मुश्किल झालं आहे.

काही लोक म्हणाले की, हे चीनमध्ये आढळणारे पॉप्लरची फुलं आहेत. यावेळी झाडांवर फुलं आणि बीया भरपूर आहेत. ही फुलं जेव्हा पडतात तेव्हा कॅटरपिलर्ससारखे दिसतात. तेच दुसरं मत असं आहे की, वेगवाग हवेसोबत हे किडे येत आहेत. Mother Nature Network नावाच्या सायन्स जर्नलमध्ये सांगण्यात आलं आहे की, अशाप्रकारच्या वादळासोबत जीवांचं येणं काही नवीन नाही. याआधी आकाशातून मासे खाली पडले होते. हे अनेक देशांमध्ये घडलं होतं.

Web Title: Mysterious rain storm of worms in China residents use umbrellas for protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.