निसर्गाचा अजब करिश्मा आहे दगडांची ही नदी, वैज्ञानिकांनाही समजलं नाही गुपित!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 03:47 PM2023-02-11T15:47:17+5:302023-02-11T15:52:07+5:30

Stone River : ही नदी निसर्गाचा हा करिश्माच आहे. पण या नदीचं रहस्य वैज्ञानिक अजूनही उकलू शकले नाहीत. या नदीत जवळपास सहा किलोमीटरपर्यंत तुम्हाला केवळ दगडच दगड दिसेल.

Mysterious river Russia big stone river know interesting facts | निसर्गाचा अजब करिश्मा आहे दगडांची ही नदी, वैज्ञानिकांनाही समजलं नाही गुपित!

निसर्गाचा अजब करिश्मा आहे दगडांची ही नदी, वैज्ञानिकांनाही समजलं नाही गुपित!

googlenewsNext

Stone River : तुम्ही पाण्याने खळखळून वाहणाऱ्या अनेक नद्या पाहिल्या असतील, पण कधी तुम्ही अशा नदीबाबत ऐकलंय का ज्यात पाण्याऐवजी दगडंच दगडं असतील. तुम्हाला  विश्वास बसणार नाही, पण रशियामध्ये एक अशीच नदी आहे. या कारणानेच दगडाच्या या नदीला स्टोन रिव्हर किंवा स्टोन रन असं म्हटलं जातं.

ही नदी निसर्गाचा हा करिश्माच आहे. पण या नदीचं रहस्य वैज्ञानिक अजूनही उकलू शकले नाहीत. या नदीत जवळपास सहा किलोमीटरपर्यंत तुम्हाला केवळ दगडच दगड दिसेल. हे दगड बघण्यासाठी एखाद्या नदीच्या धारेसारखेच वाटतात. २० मीटर छोट्या धारेपासून ते कुठे कुठे ही नदी २०० ते ७०० मीटर मोठी धारेचं रूप घेते.

या अनोख्या नदीमध्ये छोट्या छोट्या दगडांपासून ते मोठाले दगड आहेत. साधारण येथील १० टन वजनी दगड चार ते सहा इंच जमिनीत रूतलेले आहेत. हेच कारण आहे की, इथे कोणत्याही प्रकारची वनस्पती उगवत नाही. तर नदीच्या आजूबाजूला देवदारची उंचच उंच झाडे आहेत.

आता तुम्ही विचार करत असाल की, हे इतके दगड आले कुठून आणि त्यांनी नदीचं रूप कसं धारण केलं? यावर काही वैज्ञानिकांचं मत आहे की, साधारण १० हजार वर्षांआधी उंच डोंगरावरून ग्लेशिअर तुटून खाली पडले, ज्यामुळे ही अनोखी नदी तयार झाली.

Web Title: Mysterious river Russia big stone river know interesting facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.