२ हजार वर्ष जुन्या गुहेचं आश्चर्यकारक रहस्य, सर्वसामान्यांना इथे जाण्यास आहे बंदी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 01:03 PM2019-12-05T13:03:41+5:302019-12-05T13:10:48+5:30

२००३ च्या ऑक्टोबरमध्ये पुरातत्ववादी सर्जियो गोमेज पिरॅमिड ऑफ तियोथिहुआकेनच्या संरक्षणात व्यस्त होते आणि जोरदार पाऊस सुरू झाला होता.

Mystery of 2000 year old dangerous and secret tunnel of mexico | २ हजार वर्ष जुन्या गुहेचं आश्चर्यकारक रहस्य, सर्वसामान्यांना इथे जाण्यास आहे बंदी!

२ हजार वर्ष जुन्या गुहेचं आश्चर्यकारक रहस्य, सर्वसामान्यांना इथे जाण्यास आहे बंदी!

Next

(Image Credit : washingtonpost.com)

२००३ च्या ऑक्टोबरमध्ये पुरातत्ववादी सर्जियो गोमेज पिरॅमिड ऑफ तियोथिहुआकेनच्या संरक्षणात व्यस्त होते आणि जोरदार पाऊस सुरू झाला होता. एका रात्री गोमेज हे आपलं काम करत असताना त्यांना दिसलं की, पावसाच्या पाण्यामुळे जमिनीला खड्डा पडला. दुसऱ्या दिवसी दोराच्या मदतीने गोमेज या खड्डयात उतरले. जेवळपास १४ मीटरपर्यंत खाली गेल्यावर त्यांना एक गुहा दिसली.

गोमेज यांनी त्यांच्या या शोधाबाबत बीबीसीला सांगितले की, 'गुहा पाहिल्यावर लगेच मला वाटलं होतं की, ही महत्वपूर्व आहे. पण त्यावेळी या गुहेचं महत्व मला माहीत नव्हतं. नंतर काही दिवसांनी माझ्या लक्षात आले की, ही गुहा २ हजार वर्षाआधी तियोथिहुआकेन शहरात तयार करण्यात आली होती. चला जाणून घेऊ काय आहे मेक्सिकोमधील या गुहेचं रहस्य...

जेव्हा मनुष्य व्हायचे देव

असं सांगितलं जातं की, येसू ख्रिस्ताच्या जन्माच्या ४५० वर्षांआधीची ही सभ्यता होती आणि येशूंच्या जन्मानंतर ५५० वर्षांपर्यत ही सभ्यता टिकून होती. या ऐतिहासिक शहरात जवळपास २ लाख लोक राहत होते. तियोथिहुआकेन शब्दाचा अर्थ होतो 'जिथे मनुष्य देव बनतात'. याबाबत तज्ज्ञ सांगतात की, पूर्वी अमेरिकी महाद्वीपातील हे सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर होतं.

पृथ्वीच्या खालील रस्ता

या गुहेच्या शोधामुळे या ऐतिहासिक शहराचा इतिहास जाणून घेण्यास मदत झाली. असंही मानलं जातं की, ही गुहा तियोथिहुआकेन शहरातील लोकांनीच नष्ट केली होती. नंतर अनेक शतकांनंतर एजटेक लोक या शहरात राहू लागले.

कशी आहे ही गुहा

ही गुहा गेल्या साधारण १७०० वर्षांपासून बंद होती आणि २००९ मध्ये याचा शोध सुरू झाला. रोबोट्सच्या मदतीने या गुहेतील संरचनेचा शोध घेण्यात आला. गुहेच्या मुख्य द्रारापासून शेवटपर्यंतची लांबी १०३ मीटर आहे. तज्ज्ञांनुसार, तियोथिहुआकेनमध्ये राहणाऱ्या लोकांनी या गुहेचा वापर केला. पण नंतर ही गुहा बंद करण्यात आली. असं करण्यामागचं कारण अजून समोर आलेलं नाही. 

गोमेज आणि त्यांच्या टीमला या गुहेतील अनेक गोष्टी शोधण्यासाठी ८ वर्षे लागलीत. हजारो टन माती आणि दगडांना ब्रश आणि सुयांच्या माध्यमातून दूर करण्यात आलं. या गुहेतून २ लाखांपेक्षा अधिक वस्तू ताब्यात घेण्यात आल्या. या वस्तूंमधून तेव्हाची संस्कृती समजून येते.

(Image Credit : archaeology.org)

मेक्सिकोमधील या गुहेत १४ संरक्षित बॉल आढळून आलेत. तसेच चार मूर्तीही सापडल्या. ज्यातील तीन महिलांच्या तर एक पुरूषांची होती. महिलांच्या मूर्ती पुरूषांच्या मूर्तीपेक्षा मोठ्या आहेत. महिलांच्या मूर्ती पूर्ण कपड्यानिशी आहेत तर पुरूषांच्या मूर्ती अर्धनग्न आहेत. यावरून त्या संस्कृतीत महिलांची शक्ती माहीत होते. 

सर्वसामान्यांसाठी बंद

ही गुहा आता बंद करण्यात आली असून सर्वसामान्य लोकांना कधीच यात जाऊ दिलं गेलं नाही. गोमेज यांनी याचं कारण सांगितलं की, ही एक धोकादायक जागा आहे. ही जागा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी लागतील. जास्त लोक यात गेल्याने तुटूही शकते.


Web Title: Mystery of 2000 year old dangerous and secret tunnel of mexico

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.