काय सांगता! इथे ७० वर्षापासून झाला नाही कुणाचा मृत्यू, काय आहे यामागचं रहस्य?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 06:42 PM2021-10-20T18:42:48+5:302021-10-20T18:44:04+5:30
हे ठिकाण आहे नॉर्वेमध्ये. इथे अनेक सुंदर ठिकाणे आहेत ज्यामुळे हे ठिकाण जगातल्या सर्वात सुंदर ठिकाणांमध्ये गणलं जातं.
भारतासहीत जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांबाबत वाचल्यावर लोकांना विश्वास बसत नाही. एका अशाच ठिकाणाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या ठिकाणावर गेल्या ७० वर्षांपासून कुणाचाही मृत्यू झाला नाही. हे ऐकून तुम्हाला अजब वाटत असेल, पण हे सत्य आहे. चला जाणून घेऊ या ठिकाणाबाबतचं रहस्य....
हे ठिकाण आहे नॉर्वेमध्ये. इथे अनेक सुंदर ठिकाणे आहेत ज्यामुळे हे ठिकाण जगातल्या सर्वात सुंदर ठिकाणांमध्ये गणलं जातं. नॉर्वेमधील या ठिकाणाचं नाव आहे लॉंग इअरबेन. या ठिकाणी कुणीही मरू शकत नाही. याचं कारणही तेवढंच हैराण करणारं आहे.
नॉर्वेला मिडनाइट सन नावानेही ओळखलं जातं. या देशात अनेक मे महिन्यापासून ते जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत सूर्यास्त होत नाही. इथे सतत ७६ दिवसांपर्यंत दिवस राहतो आणि रात्र होत नाही. येथील स्वालबार्डमध्येही सूर्य १० एप्रिल ते २३ ऑगस्टपर्यंत बुडत नाही. लॉंग इअरबेन येथील प्रशासनाने एक कायदा तयार केला. ज्यानुसार येथील लोक मरू शकत नाही.
काय आहे कायदा?
नॉर्वे उत्तर ध्रुव येथील लॉंग इअरबेनमध्ये वर्षभर भीषण थंडी पडते. ज्यामुळे इथे मृतदेह सडत नाही. त्यामुळे प्रशासनाने इथे माणसाच्या मृत्यूवर बॅन लावला आहे. सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे या शहरात ७० वर्षापासून कुणाचाही मृत्यू झाला नाही.
१०० वर्षाआधी झाला होता मृत्यू
या अनोख्या शहरात ख्रिश्चन धर्माचे लोक जास्त राहतात. १९१७ मध्ये इथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याला इन्फ्लुएंजाने पीडित होता. या व्यक्तीचा मृतदेह लॉंग इअरबेन दफन केलं गेलं होतं. पण त्याच्या मृतदेहात अजूनपर्यंत इन्फ्लुएंजा व्हायरस होता. याच कारणामुळे प्रशासनाने इथे कुणालाही मरण्यावर बंदी घातली. जेणेकरून शहराला महामारीपासून वाचवलं जाईल.
या शहराची लोकसंख्या साधारण २ हजार आहे. जर इथे एखादी व्यक्ती आजारी पडली. तर त्याला विमानाने दुसऱ्या ठिकाणी पोहोचवलं जाते. नंतर त्याच ठिकाणी त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केला जातो.