व्यक्तीच्या पोटात सापडली 233 नाणी, बॅटरी, चुंबक अन् खिळे; एक्स-रे पाहून डॉक्टर 'कोमात'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 01:21 PM2022-06-27T13:21:07+5:302022-06-27T13:21:29+5:30
जेव्हा डॉक्टरांकडे गेला तर डॉक्टरही हैराण झाले. बालपणी या व्यक्तीने पोटात अशी काही वस्तू जमा करून ठेवल्या होत्या, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
बालपणी अनेकदा असं होतं की, कळत-नकळत आपण काही अशा वस्तू खातो, ज्या पुढे जाऊन समस्येचं कारण ठरू शकतात. जर मुलांवर लक्ष दिलं नाही तर ते खतरनाक चुका करतात. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीच्या पोटात दुखू लागलं होतं. जेव्हा डॉक्टरांकडे गेला तर डॉक्टरही हैराण झाले. बालपणी या व्यक्तीने पोटात अशी काही वस्तू जमा करून ठेवल्या होत्या, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
metro च्या वृत्तानुसार, तुर्कीच्या इपेक्योलूमध्ये एका व्यक्तीच्या पोटात दुखू लागलं होतं. त्यानंतर तो डॉक्टरांकडे गेला. त्याचा मोठा भाऊ त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. पोट दुखण्याचं कारण जाणून घेण्यासाठी त्याचा एक्स-रे काढण्यात आला. जो पाहून डॉक्टरांना धक्का बसला. या व्यक्तीच्या पोटात 233 नाणी, बॅटरी, चुंबक, खिळे, काचेचे तुकडे, दगड आणि इतरही काही वस्तू आढळून आल्या.
डॉक्टरांनी अशी केस ना पाहिली होती ना ऐकली होती. Burhan Demir च्या भावाच्या पोटात दुखत होतं. अशात जेव्हा तो भावाला डॉक्टरकडे घेऊन गेला. तेव्हा डॉक्टर रिपोर्ट पाहून हैराण झाले. कुणाला विश्वासही बसत नव्हता की, असंही होऊ शकतं. रिपोर्टनुसार, अल्ट्रासाउंड, एक्स-रे स्कॅनिंगसोबतच व्यक्तीची एंडोस्कोपीही करण्यात आली. सगळे रिपोर्ट पाहिल्यानंतर आढळलं की, व्यक्तीच्या पोटात पूर्ण टूल मशीनच होती. यात शेकडो नाणी, बॅटरी, चुंबक, खिळे, काकेचे तुकडे, दगड यांचा समावेश होता.
आश्चर्याची बाब म्हणजे अनेक वर्ष पोटात या वस्तू असूनही व्यक्ती इतकी वर्ष जिंवत होती. सामान्यपणे अशा केसेसमध्ये लोक जास्त काळ जगत नाहीत. पण ही व्यक्ती 35 वर्ष व्यवस्थित होती. सर्जरीनंतर या व्यक्तीच्या पोटातून सगळं काही बाहेर काढण्यात आलं. रूग्ण आता रिकवर होत आहे. बालपणी अनेकदा असं होतं की, मुलं काही न विचारता तोंडात टाकतात. ते मोठे झाल्यावर समजतं की, त्यांनी बालपणी हे असं काही केलं होतं.