'हा' टॅटु दूर करेल तुमच्या आरोग्याच्या गंभीर समस्या, वैज्ञानिकांनी लावला अद्भूत शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 07:11 PM2022-08-07T19:11:39+5:302022-08-07T19:13:09+5:30
सध्या तर वैज्ञानिक असं संशोधन करत आहेत ज्यामुळे आपल्याला कोणत्याही आजारापूर्वीच त्याबद्दल समजू शकेल. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही वैद्यकीय उपकरणाची गरज नाही तर केवळ एका टॅटूमुळे आपल्याला आजारापूर्वीच त्याबद्दल समजू शकणार आहे.
जसजसं विज्ञान प्रगती करत आहे तसं विज्ञानावर आधारित अनेक नवनवीन गोष्टींचा शोध लागत आहे. यातील अनेक गोष्टी आपल्याला थक्क करणाऱ्या आहेत. आपण विचारही करू शकत नाही असे अनेक शोध विज्ञानामुळे लागलेले आहेत. याचा सगळ्यांत जास्त फायदा वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्राला होत आहे. या पूर्वी एखाद्या आजारानं अगदी गंभीर स्वरुप धारण केलं की मगच त्याबद्दल कळायचं. पण आता मात्र आपल्याला आजारांबद्दल बरंच आधीपासून समजू शकतं. सध्या तर वैज्ञानिक असं संशोधन करत आहेत ज्यामुळे आपल्याला कोणत्याही आजारापूर्वीच त्याबद्दल समजू शकेल. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही वैद्यकीय उपकरणाची गरज नाही तर केवळ एका टॅटूमुळे आपल्याला आजारापूर्वीच त्याबद्दल समजू शकणार आहे (tattoo will tell about body).
दक्षिण कोरियातील वैज्ञानिक (South Korean nanotech tattoo) एक अगदी आश्चर्यकारक संशोधन करण्यात सध्या व्यस्त आहेत. हे संशोधन जर यशस्वी झालं तर संपूर्ण मानवजातीसाठी ते एक वरदान ठरणार आहे. दक्षिण कोरियाचे वैज्ञानिक शरीरावर टॅटूच्या रुपात असणारं एक डिव्हाईस बनवत आहेत (tattoo used as health monitor) आणि त्याच्या मदतीनं त्या व्यक्तीच्या शरीराची नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दल कळेल. त्यामुळे त्याला काही आजार आहे का याबद्दलही लगेचच समजू शकेल.
दक्षिण कोरियाच्या ॲडव्हान्स्ड इन्स्टिट्युट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील (Advanced Institute Of Science And Technology) वैज्ञानिकांनी एक इलेक्ट्रॉनिक टॅटू इंक (Electronic Tattoo Ink) तयार केली आहे. ही इंक लिक्विड मेटल आणि कार्बन नॅनोट्यूबचा वापर करून तयार करण्यात आली आहे. हा टॅटू बायोइलेक्ट्रोडप्रमाणे काम करतो. हा टॅटू ईसीजी डिव्हाईसला जोडल्यास त्यामुळे त्या व्यक्तीची हृदयाची परिस्थिती नेमकी कशी आहे ते कळू शकेल तसंच शरीरातील ग्लुकोज लेव्हलचं प्रमाण समजेल. हे सगळं मॉनिटरवर दिसू शकेल.
यात पुढे जाऊन बायोसेन्सरचा वापर करण्याची संशोधकांची इच्छा आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान अधिक हायटेक असल्याचं सिद्ध होईल. यानंतरच्या काळात या टॅटू इंकबरोबर एक वायरलेस चिपही टाकण्यात येणार असल्याचं या प्रोजेक्टचे लीडर स्टीव्ह पार्क यांनी सांगितलं. ही वायरलेस चिप बाहेरच्या डिव्हाईसवर एक सिग्नल पाठवेल. या सिग्नलमुळे शरीराची नेमकी अवस्था काय आहे, त्यात काही बिघाड झाला आहे का हे समजू शकेल. ज्या मॉनिटरवर ही चिप सिग्नल पाठवेल तो मॉनिटर रुग्णाच्या घरीही इन्स्टॉल करता येऊ शकेल. शरीरावरून टॅटू पुसून टाकला तरी त्याची इंक शरीरात असेल हे या इंकचं वैशिष्ट्य. ही इंक गॅलियमसारख्या पार्टिकल्सनं बनलेली आहे. त्यामुळे आता दक्षिण कोरियाच्या संशोधकांचा हा शोध यशस्वी होईल याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.