नेपोलियनने पत्नीला लिहिले Love Letter चा लिलाव, मिळालेली किंमत वाचून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 02:04 PM2019-04-05T14:04:02+5:302019-04-05T14:07:27+5:30
हे तीन पत्र त्याच्या पत्नीला १७९६ आणि १८०४ दरम्यान लिहिले होते.
फ्रान्सचा नेपोलियन बोनापार्ट याने त्याची पत्नी जोसेफिनला लिहिलेल्या तीन पत्रांचा लिलाव नुकताच करण्यात आला. या लिलावात एकूण तीन पत्रांचा लिलाव करण्यात आला. हे तिन्ही पत्र एकूण ५,१३,००० यूरो (575,000 अमेरिकन डॉलर) म्हणजेच साधारण ४ कोटी रूपयांना विकले गेले.
(Image Credit : Cocktail Zindagi)
नेपोलियन बोनापार्टने हे तीन पत्र त्याच्या पत्नीला १७९६ आणि १८०४ दरम्यान लिहिले होते. १७९६ मध्ये इटली अभियानादरम्यान लिहिलेल्या एका पत्रात फ्रान्सच्या बोनापार्टने लिहिले की, 'माझी प्रिय मैत्रीण. तुझ्याकडून मला एकही पत्र मिळालं नाही. नक्कीच काहीतरी खास सुरू असेल म्हणून तू तुझ्या पतीला विसरली. पण काम करताना आणि फार थकवा आला की, केवळ आणि केवळ तुम्ही आठवण येते'.
फ्रेन्च एडर आणि एहगुट्स हाऊसकडून ऐतिहासिक थीमवर आधारित लिलावात एक दुर्मिळ इनिग्मा एन्क्रिप्शन मशीनचाही समावेश करण्यात आला होता. या मशीनचा वापर नाझी जर्मनीने द्वितीय महायुद्धादरम्यान केला होता. या मशीनचा लिलाव ४८,१०० यूरोंना करण्यात आला.