ड्रिम जॉब! इथे केवळ झोपा काढण्यासाठी मिळणार १३ लाख रूपये पगार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 11:55 AM2019-03-28T11:55:22+5:302019-03-28T11:55:59+5:30

असं काही लोकांना वाटत असतं की, त्यांची नोकरी अशी आरामादायी असावी. पैसेही भरपूर मिळावेत आणि काही कामही करावं लागू नये.

NASA and ESA are paying volunteers to lie in bed for 60 days | ड्रिम जॉब! इथे केवळ झोपा काढण्यासाठी मिळणार १३ लाख रूपये पगार!

ड्रिम जॉब! इथे केवळ झोपा काढण्यासाठी मिळणार १३ लाख रूपये पगार!

Next

(Image Credit : digitaltrafficace.com)

असं काही लोकांना वाटत असतं की, त्यांची नोकरी अशी आरामादायी असावी. पैसेही भरपूर मिळावेत आणि काही कामही करावं लागू नये. काही लोकांना अशी नोकरी मिळते सुद्धा. पण आता अशी नोकरी करण्याची एक मोठी संधी चालून आली आहे. आम्ही जर सांगितलं की, एक अशी नोकरी आहे जिथे तुम्हाला केवळ झोपायचं आहे आणि यासाठी तुम्हाला १३ लाख रूपये मिळतील. तर तुमचा विश्वास बसेल का? कदाचित बसणार नाही. पण हे खरंय.

नासा आणि यूरोपियन स्पेस एजन्सी(इएसए) झिरो ग्रॅव्हिीटच्या परिक्षणासाठी २४ लोकांचा शोध घेत आहे. हे परिक्षण ६० दिवसांपर्यंत चालणार आहे. आणि यात सहभागी लोकांना भरपूर पैसेही मिळणार आहेत. 

नासाकडून हे परिक्षण जर्मनीमध्ये केलं जाणार आहे. यासाठी नासाला २४ लोकांची गरज आहे. त्यांना १२-१२ अशा दोन गटात विभागण्यात येईल. संपूर्ण ६० दिवस या लोकांना केवळ बेडवर घालवायचे आहेत. यादरम्यान सहभागी लोकांचं डोकं थोडं खाली आणि पाय वरच्या बाजूला असतील. याने शरीरात रक्तप्रवाह कमी होईल. 

(Image Credit : dailymail.co.uk)

फार जास्त काळ स्पेसमध्ये राहिल्यानंतर अंतराळवीरांच्या मांसपेशींमध्ये असामान्य क्रिया होऊ लागतात. नासा आणि ईएसए या संस्थांना हे जाणून घ्यायचं आहे की, झिरो ग्रॅव्हिटीमध्ये शरीरात आणखी काय काय बदल होतात. सोबतच जास्त काळ स्पेसमध्ये राहत असताना या परिक्षणाचा अंतराळवीरांना काय फायदा मिळू शकतो हेही जाणून घ्यायचं आहे. 

सध्या दुसऱ्या राऊंडसाठी १२ लोकांची भरती केली जाणार आहे. यादरम्यान सहभागी लोक टीव्ही, सिनेमे बघू शकतात, पुस्तके वाचू शकतात. तसेच काही गेमही खेळू शकतात. यासाठी नासाकडून प्रत्येक व्यक्तीला साधारण १३ लाख रूपये दिले जाणार  आहेत. 

Web Title: NASA and ESA are paying volunteers to lie in bed for 60 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.