मंगळ ग्रहावर दिसला अनोखा नजारा, फोटो बघून वैज्ञानिकही झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 14:36 IST2021-12-03T14:34:56+5:302021-12-03T14:36:24+5:30
Perseverance mars rover : काही दिवसांपूर्वी पर्सीवरेन्स रोव्हरने एक फोटो पाठवला होता. ज्यात लाल ग्रहावर एक दगड दिसला होता. याआधी डायनासॉरच्या तोंडासारखा दगड दिसला होता.

मंगळ ग्रहावर दिसला अनोखा नजारा, फोटो बघून वैज्ञानिकही झाले हैराण
मंगळ ग्रहावर (Mars) जीवनाचा शोध घेत असलेला अमेरिकन संस्था नासाच्या (NASA) पर्सीवरेन्स रोव्हरने (Perseverance mars rover) लाल ग्रहाहून एक अनोखा फोटो पाठवला आहे. पर्सीवरेन्स मार्स रोव्हर नेहमीच काहीना काही फोटो पाठवत असतो. कधी कधी हे फोटो विचित्र आणि अनोखे असतात. जे बघून वैज्ञानिकही हैराण होतात. तर काही फोटो लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वी पर्सीवरेन्स रोव्हरने एक फोटो पाठवला होता. ज्यात लाल ग्रहावर एक दगड दिसला होता. याआधी डायनासॉरच्या तोंडासारखा दगड दिसला होता.
नासाच्या पर्सीवरेन्स मार्स रोव्हरने यावेळी जो फोटो पाठवला तो फारच वेगळा आहे. या फोटोत दिसणारी आकृती फारच अजब आहे. यावेळी मंगळ ग्रहावर मनुष्याच्या पार्श्वभागासारख्या आकाराचा दगड सापडला आहे. हा दगड रोव्हरला जूनमध्ये दिसला होता. रोव्हरने हा फोटो नासाच्या हेडक्वार्टर्सला पाठवला तेव्हा वैज्ञानिकही हैराण झाले.
आता हा फोटो फार व्हायरल झाला आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लेबॉरेटरीने या दगडाला बट क्रॅक रॉक नाव दिलं आहे. हा फोटो जेपीएलमध्ये काम करत असलेल्या डेटा आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर केविन एम. गिलने त्याच्या ट्विटरवर शेअर केला आहे. केविन एम. गिल रोव्हर द्वारे पाठवलेल्या बेकार आणि धुसर फोटोंना जोडून एक पूर्ण फोटो तयार करतात. केविन एम. गिलने कॅप्शनला लिहिलं आहे की, आम्हाला बट क्रॅक रॉक सापडला आहे.
याआधी रोव्हरने असाच एक अनोखा फोटो पाठवला होता. हा फोटो ब्राचियोसॉरस डायनासॉरच्या मानेसारखा दिसत होता. त्यासोबतच पर्सीवरेन्स रोव्हरने एका हिरव्या रंगाच्या दगडाचाही फोटो पाठवला होता. मार्स पर्सीवरेन्स रोव्हरला हा दगड तेव्हा दिसला जेव्हा इंजीन्यूटी हेलिकॉप्टरला पृष्ठभागावर उतरवल्यावर पुढे सरकत होतं.