NASA ने शेअर केला आकाशगंगेच्या केंद्राचा अद्भूत फोटो, पहिल्यांचा समोर आला असा नजारा...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 05:00 PM2021-05-29T17:00:25+5:302021-05-29T17:02:56+5:30
चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरीला १९९९ मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. तो आता पृथ्वीच्या फेऱ्या मारत आहे.
अमेरिकन स्पेस एजन्सी NASA ने आपल्या आकाशगंगा मिल्की वे चा एक फारच सुंदर आणि अंतराळातील ऊर्जेचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो मिल्की वे डाउनटाऊनचा आहे. म्हणजे आकाशगंगेतील अशी जागा जी याच्या केंद्रात आहे. इथे बऱ्याच खगोलीय हालचाली घडत असतात. असं मानलं जातं की, इथे सर्वात जास्त हालचाल होत राहते.
या फोटोबाबत सांगितलं गेलं की हे गेल्या दोन दशकांपासून पृथ्वीच्या फेऱ्या मारत असलेल्या चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरी द्वारा करण्यात आलेल्या ३७० ऑब्जर्वेशनचा परिणाम आहे. याने मिल्की वेच्या केंद्रात अब्जो तारे आणि ब्लॅक होल्सचे फोटो काढले. ज्यानंतर हा फोटो समोर आला. या फोटोच्या कंस्ट्रास्टसाठी दक्षिण आफ्रिकेतील एका रेडीओ टेलिस्कोपनेही योगदान दिलं आहे.
Unravel the threads of superheated gas and magnetic fields that make up the tapestry of energy of our Milky Way galaxy. 🌌
— NASA (@NASA) May 27, 2021
A new image from @ChandraXray brings to life the giant mosaic of data that weaves together this cosmic masterpiece. Discover more: https://t.co/UJZMMDe2Zgpic.twitter.com/jkNgFXk2z2
यूनिव्हर्सिटी ऑफ मॅसाच्युसेट्स एमहर्स्टचे संशोधक डॅनिअल वांग शुक्रवारी म्हणाले की, त्यांनी महामारी दरम्यान घरी राहताना हे काम करण्यात एक वर्ष घालवलं. वांग यांनी ई-मेलच्या माध्यमातून सांगितलं की, या फोटोत आपण जे बघतो आहोत ती आपल्या आकाशगंगच्या डाऊनटाऊनमध्ये होत असलेली हिंसक किंवा ऊर्जावान इकोसिस्टीम आहे.
डॅनिअल वांग म्हणाले की, आकाशगंगेच्या केंद्रात बरेच सुपरनोवा अवशेष, ब्लॅक होल्स आणि न्यूट्रॉन तारे आहेत. प्रत्येक एक्स-रे किंवा बिंदू किंवा विशेषता एक ऊर्जावान स्त्रोताचं प्रतिनिधित्व करतो. ज्यातील जास्तीत जास्त केंद्रात आहेत. वांग यांनी याचा हा रिपोर्ट रॉयल एस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या मॅगझिनच्या जूनच्या अंकात प्रकाशित केला जाणार आहे. चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरीला १९९९ मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. तो आता पृथ्वीच्या फेऱ्या मारत आहे.