मंगळ ग्रहावर असा होतो सूर्यास्त, NASA पहिल्यांदाच दाखवला अद्भुत फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 04:24 PM2021-11-26T16:24:44+5:302021-11-26T16:27:57+5:30
Sunset On Mars : नासाने ग्रहांवर सूर्यास्त (Sunset) कसा होतो याचा एक फोटो शेअर केलाय. हा फोटो जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
पृथ्वीवर उगवणाऱ्या आणि डुबणाऱ्या सूर्यांचे फोटो तर आपण नेहमीच बघतो. यावेळी आकाशात दिसणारा नजारा फारच मनमोहक असतो. पृथ्वीवरून सूर्याचे उगवतानाचे आणि डुबताना वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतलेले फोटो सोशल मीडियावर बघायला मिळतात. जे फारच सुंदर असतात. पण तुम्ही कधी दुसऱ्या ग्रहावर सूर्याचा उगवतानाचा किंवा डुबतांनाचा फोटो पाहिलाय? नक्कीच पाहिली नसेल. मात्र, नासाने ग्रहांवर सूर्यास्त (Sunset) कसा होतो याचा एक फोटो शेअर केलाय. हा फोटो जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
नासाने (NASA) ग्रहावर सूर्यास्त कसा होतो आणि कसा दिसतो याचा फोटो पहिल्यांदा जगासमोर आणला आहे. नासाने मंगळ ग्रहावरील सूर्यास्ताचा (Sunset On Mars) फोटो शेअर केला आहे. नासा बऱ्याच वर्षापासून मंगळ ग्रहावर जीवन शोधत आहे.
नासाकडून शेअर करण्यात आलेल्या फोटोला बघून याचा अंदाज लावणं अवघड जाईल की, सूर्यास्ताचा हा फोटो पृथ्वीवरील आहे की, दुसऱ्या ग्रहावरचा. मंगळ ग्रहावर डोंगरातून सूर्यास्ताचा घेतलेला फोटो फारच सुंदर दिसत आहे.
नासाने हा फोटो त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत नासाने लिहिलं की, 'लाल ग्रहावर एक नीळा सूर्यास्त'. नासाने सांगितलं की, त्यांच्या मार्स रोव्हरने मंगळ ग्रहावर सूर्यास्ताचा पहिला फोटो घेतला आहे.
नासाने फोटो शेअर करत हेही सांगितलं की, रोव्हरने हा फोटो ९ नोव्हेंबर २०२१ ला काढला होता. मिशनच्या २५७व्या दिवशी रोव्हरने मंगळ ग्रहावरील सूर्यास्ताचा फोटो घेतला. नासाने सांगितलं की, मंगळ ग्रहावर आमचे रोबोट सूर्यास्त १९७० च्या दशकापासून बघत आले आहेत. नासानुसार, मंगळ ग्रहावर सूर्यास्त निळ्या रंगाचा दिसतो.