NASA ने शेअर केला हजारो वर्षांपूर्वी उद्धवस्त झालेल्या ताऱ्याचा Video, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 02:53 PM2022-01-25T14:53:55+5:302022-01-25T14:54:42+5:30

हजारो वर्षांपूर्वी स्फोट होऊन उद्धवस्त झालेल्या ताऱ्याचे अवशेष नासाच्या व्हिडिओत दिसत आहेत. हे आपल्या पृथ्वीपासून सूमारे 2100 प्रकाश वर्ष दूर आहेत.

NASA shared a video of a star that destroyed thousands of years ago | NASA ने शेअर केला हजारो वर्षांपूर्वी उद्धवस्त झालेल्या ताऱ्याचा Video, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

NASA ने शेअर केला हजारो वर्षांपूर्वी उद्धवस्त झालेल्या ताऱ्याचा Video, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

Next

तुम्ही नासाचे (NASA) अधिकृत सोशल मीडिया हँडल नियमितपणे फॉलो करत असाल, तर तुम्हाला त्यावर पृथ्वी आणि पृथ्वीबाहेरील आश्चर्यकारक फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतील. नासाकडून अनेकदा आपल्या सोशल मीडिया हँडलवर ब्रह्मांडातील विविध दृष्य शेअर करण्यासोबतच त्याबाबत महत्वाची माहितीही दिली जाते. असाच एक व्हिडिओ नासाने पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल.

ताऱ्याबद्दल नासाने दिली माहिती
नासाने एका ताऱ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. तुम्ही म्हणाल, यात काय विशेष ? विशेष म्हणजे, हा तारा हजारो वर्षांपूर्वी उद्धवस्त झाला असून, त्याचे अवशेष आजही ब्रह्मांडात पसरले आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करताना नासाने या ताऱ्याबद्दल माहिती देताना म्हटले की, "या फोटोमध्ये एका ताऱ्याचे अवशेष दिसत आहेत. हा तारा हजारो वर्षांपूर्वी उद्धवस्त झाला होता. या ताऱ्याचे अवशेष 110 प्रकाश-वर्ष परिसरात पसरले गेले आहेत. फोटोमध्ये दिसणारे दृष्य याचा एक छोटासा भाग आहे. हे अवशेष आपल्या पृथ्वीपासून 2,100 प्रकाश वर्ष दूर सिग्नस नक्षत्रात आहेत.''

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
3 दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडिओला शेअर केल्यापासून आतापर्यंत 1.3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका इंस्टाग्राम यूझरने लिहिले, "वॉव, अप्रतिम, हे दृष्य खरोखर सुंदर आहे." दुसर्‍याने लिहिले, "अद्भुत आणि खूप सुंदर."

Web Title: NASA shared a video of a star that destroyed thousands of years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.