12 वर्षातून एकदाच फुलतं हे फूल, दरवेळी लोक बघण्यासाठी करतात गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 03:38 PM2023-07-08T15:38:23+5:302023-07-08T15:42:21+5:30
Jarahatke : आम्ही तुम्हाला अशाच एका फुलाबाबत सांगणार आहोत. चला जाणून घेऊया या फुलाबद्दल खासियत आणि त्या ठिकाणाबद्दल...
दर चार महिन्यांनी ऋतु बदलतात आणि प्रत्येक ऋतुमध्ये वेगवेगळ्या वनस्पती उगवतात. हिवाळा आणि पावसाळ्यात जास्त वनस्पती जगतात. फुलांचाही हाच सीझन असतो. पण तुम्ही कधी अशा फुलाबाबत ऐकलंय का जे फक्त 12 वर्षांनी एकदा फुलतं? जर उत्तर नाही असेल तर आम्ही तुम्हाला अशाच एका फुलाबाबत सांगणार आहोत. चला जाणून घेऊया या फुलाबद्दल खासियत आणि त्या ठिकाणाबद्दल...
कुठे फुलतं हे फूल
तशी तर तुम्ही अनेक फुलं पाहिली असतील पण 12 वर्षातून केवळ एकदा फुलणारं हे फूल कधी पाहिलं नसेल. केरळच्या मुन्नारमध्ये प्रत्येक 12 वर्षांनी नीलकुरिन्जी हे फूल फुलतं. हे फूल बघण्यासाठी केवळ भारतातूनच नाहीतर परदेशातीलही लोक येतात.
तीन महिने बघता येणार फुलं
याआधी हे फूल 2006 आणि नंतर 2017 मध्ये फुललं होतं. हे फूल तीन महिने बघता येतं. भारतात या फुलाच्या एकूण 46 प्रजाती आढळतात. ज्याची सर्वात जास्त संख्या ही मुन्नारमध्ये आहे. जुलैच्या सुरुवातीला हे फूल फुलतं.
इतके पर्यटक येण्याची शक्यता
मीडिया रिपोर्टनुसार, केरळ पर्यटन विभागाचे निर्देशक पी. बाला किरण यांनी सांगितले की, हे फूल फुललेले असताना मुन्नार येणे सर्वात आनंददायी असते. 2017 मध्ये 628,427 पर्यटक मुन्नारमध्ये हे फूल पाहण्यासाठी आले होते. तर 2016 मध्ये 467, 881 पर्यटक आले होते.