नशेत असताना व्यक्तीने पार्श्वभागासोबत केलं असं काही, डॉक्टरही झाले हैराण; करावी लागली सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 09:05 AM2023-03-28T09:05:15+5:302023-03-28T09:06:40+5:30

या व्यक्तीने त्याच्या पार्श्वभागात स्टीलचा ग्लास टाकला होता. त्याचं ऑपरेशन करून तो ग्लास काढण्यात आला. या व्यक्तीच्या पार्श्वभागात तीन दिवस ग्लास पडून होता.

Nepal drunk man rammed a glass inside had to undergo surgery | नशेत असताना व्यक्तीने पार्श्वभागासोबत केलं असं काही, डॉक्टरही झाले हैराण; करावी लागली सर्जरी

नशेत असताना व्यक्तीने पार्श्वभागासोबत केलं असं काही, डॉक्टरही झाले हैराण; करावी लागली सर्जरी

googlenewsNext

जगभरातून इतक्या अजब घटना समोर येत असतात की, त्यावर विश्वास बसत नाही. काही तर इतक्या हैराण करणाऱ्या असतात ज्या वाचून धक्का बसतो. नेपाळमधील एका 47 वर्षीय व्यक्तीने असाच कारनामा केला. नशेत असताना त्याने असं काही केलं की, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. या व्यक्तीने त्याच्या पार्श्वभागात स्टीलचा ग्लास टाकला होता. त्याचं ऑपरेशन करून तो ग्लास काढण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीच्या पार्श्वभागात तीन दिवस ग्लास अडकून होता.

या अजब घटनेबाबत नेपाळच्या मेडिकल सेंटरच्या जर्नलमध्ये रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. या रिपोर्टनुसार, सुरूवातीला या व्यक्तीने सांगितलं की, ग्लास चुकून आत गेला. पण नंतर त्यानेच कबूल केलं की, तो नशेत होता आणि लैंगिक सुखासाठी त्याने असं असं केलं. 

रिपोर्टनुसार, या व्यक्तीच्या या कृत्यामुळे तो दोन दिवस टॉयलेटला जाऊ शकला नाही. दोन दिवस त्याने खूप वेदना सहन केल्या. पण तो गॅस पास करत होता. सुदैवाने त्याला ब्लीडिंग झालं नाही.

या व्यक्तीने डॉक्टरांना सांगितलं की, त्याने स्वत: हून ग्लास काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण काही होऊ शकलं नाही. डॉक्टरांनी आधी या व्यक्तीचा एक्स-रे काढला. त्यांनी ग्लास काढण्याचाही प्रयत्न केला. पण पार्श्वभागात उलट्या पोजीशनमध्ये होता. त्यानंतर डॉक्टरांनी Exploratory laparotomy सर्जरी केली जी पोटासाठी केली जाते. पण याने काही झालं नाही. मग डॉक्टरांनी Enterostomy सर्जरी केली. तेव्हा ग्लास काढण्यात आला.

सर्जरी झाल्यावर व्यक्तीला 7 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. साधारण 2 महिन्यांच्या फॉलोअपनंतर डॉक्टरांनी सांगितलं की, व्यक्ती आता पूर्णपणे बरी आहे. 

Web Title: Nepal drunk man rammed a glass inside had to undergo surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.