बोंबला! घर घेण्यासाठी त्याने खर्च केले तब्बल ४ कोटी रूपये अन् मिळालं अर्धच घर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 01:59 PM2021-04-14T13:59:57+5:302021-04-14T14:11:06+5:30

आर्यल नव्या आयुष्याला सुरूवात कऱण्यासाठी नेपाळहून ऑस्ट्रेलियाला गेला होता. इथे त्याने घर तयार करणाऱ्या Zac Homes या कंपनीसोबत एक करार केला होता.

Nepal man spent 4 Crore in house and get half side in Australia | बोंबला! घर घेण्यासाठी त्याने खर्च केले तब्बल ४ कोटी रूपये अन् मिळालं अर्धच घर!

बोंबला! घर घेण्यासाठी त्याने खर्च केले तब्बल ४ कोटी रूपये अन् मिळालं अर्धच घर!

googlenewsNext

आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग हे घर तयार करण्यासाठी लोक दिवसरात्र मेहनत करतात. असंच स्वत:च्या सुंदर घराचं स्वप्न नेपाळच्या Bishnu Aryal ने पाहिलं होतं. तो सध्या ऑस्ट्रेलियात राहतो. तिथेच काम करतो. त्याने कोट्यावधी रूपये खर्च करून घर खरेदी केलं. पण जेव्हा त्याला घर मिळालं तेव्हा त्याला हार्ट अटॅक यायचाच बाकी राहिला.

इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार, आर्यल नव्या आयुष्याला सुरूवात कऱण्यासाठी नेपाळहून ऑस्ट्रेलियाला गेला होता. इथे त्याने घर तयार करणाऱ्या Zac Homes या कंपनीसोबत एक करार केला होता. हा करार ३२२,४०० डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार १.८५ कोटी रूपयांचा होता. हा करार एका घरासाठी होता. यानंतर घरासाठी वेगळी जमीन खरेदी केली गेली. ज्यासाठी त्याला २.२ कोटी रूपये द्यावे लागले.

धक्कादायक बाब म्हणजे इतके पैसे देऊनही त्याला पूर्ण घर मिळालं नाही. त्याला जमिनीच्या अर्ध्या भागावर बांधलेलं घरच दिलं गेलं. आर्यल म्हणाला की, कंपनीसोबत कदाचित काही मिस कम्युनिकेशन झालं. ज्यामुळे कंपनीने अर्ध्या प्लॉटवर घर बनवलं आणि अर्धा प्लॉट रिकामाच ठेवला. (हे पण वाचा : अजबच! स्वत:च्या अपत्यासोबत विवाह करण्याची इच्छा, परवानगीसाठी घेतली कोर्टात धाव)

बेशुद्ध होता होता राहिला

Nine News सोबत बोलताना आर्यल म्हणाला की, 'मी सुपरवायजरला बोलवलं आणि त्याला विचारले की, हे काय केलंय? हे घर असं का आहे? तर तो म्हणाला की, हे डुप्लेक्स आहे. सेमी डुप्लेक्स आहे. हे ऐकून मी त्या दिवशी बेशुद्धच पडलो होतो'. तो सुपरवायजरला पुढे म्हणाला की, 'माझं घर कुठे आहे? मला माझी बाकीचं घरही हवं आहे. हे डुप्लेक्स नाहीयेय हे अर्ध घर आहे'. (हे पण वाचा : बोंबला! 'या' तरूणीने भरले नव्हते १९९ चालान, पोलिसांनी तिची कोट्यावधींची लॅम्बॉर्गिनी उचलून नेली!)

रिपोर्ट्सनुसार, कंपनीसोबतचा करार तर फ्री स्टॅंडिंग होमसाठीच होता. तीन वर्षांनी जेव्हा आर्यललने पाहिले की, पूर्ण पैसे देऊनही त्याला अर्धच घर मिळत आहे तर तो हैराण झाला. त्याने सांगितले की, त्याचं इंग्रजी इतकं चांगलं नाही. पण त्याने अर्ध्या घरासाठी साइन केलं नव्हतं. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.  
 

Web Title: Nepal man spent 4 Crore in house and get half side in Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.