550 मुलांचा पिता, कोर्टाने घातली त्याच्यावर बंदी; पुन्हा चूक केली तर द्यावा लागेल 90 लाख रूपये दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 03:57 PM2023-04-29T15:57:54+5:302023-04-29T15:58:08+5:30
एक व्यक्ती असाच अडचणीत सापडला. तो 550 मुलांचा पिता आहे. त्याच्या या कारनाम्यासाठी कोर्टाने त्याच्यावर बंदी घातली आहे.
पैसे कमावण्यासाठी काही लोक काहीही करायला तयार होतात. मग ते हेही बघत नाहीत की, त्यांचं वागणं नैतिक, सामाजिक आणि कायदेशीर बरोबर आहे की नाही. पैशांसाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. पण असं करून ते अडचणीतही सापडतात. नेदरलॅंडमधील एक व्यक्ती असाच अडचणीत सापडला. तो 550 मुलांचा पिता आहे. त्याच्या या कारनाम्यासाठी कोर्टाने त्याच्यावर बंदी घातली आहे.
डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, नेदरलॅंड (Netherland sperm donor) च्या एका कोर्टाने 41 वर्षीय जॉनथन मेअरवर बंदी घातली आहे. ती ही की, जॉनथन अजून आणखी मुलांचा पित होऊ शकत नाही. पण तो खरंच 550 मुलांचा पिता आहे का? तर हो. तो प्रत्यक्षपणे नाही तर पण तो तरीही तो 550 मुलांचा पिता आहे. जॉनथन एक स्पर्म डोनर आहे. तो नेदरलॅंडमधील अनेक क्लीनिकमध्ये स्पर्म डोनेट करतो आणि खूप पैसे कमावतो. पण त्याच्यावर आता कोर्टाने त्याच्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे स्पर्म डोनेट करू शकणार नाही.
रिपोर्टनुसार, जर जॉनथन याने पुन्हा असं केलं तर त्याला दंड म्हणून 90 लाख रूपये भरावे लागतील. देशाच्या नियमांनुसार कोणताही पुरूष 12 महिलांकडून 25 मुलांचा पिता बनू शकतो. त्यापेक्षा जास्त नाही. पण जॉनथन याने या नियमाला पायदळी तुडवलं.
कोर्टात सुनावणी दरम्यान सांगण्यात आलं की, जॉनथन याने अनेकदा आपल्या क्लाएंट्सना त्याच्या डोनेशनबाबत खोटं सांगितलं. डच सोसायटी ऑफ ऑब्सटेट्रिक्स अॅंड गायनोकोलॉजीने पहिल्यांदा 2017 मध्ये जॉनथनबाबत सगळ्यांना इशारा दिला होता. पण तोपर्यंत जॉनथन नेदरलॅंडमधील 10 क्लीनिकमध्ये स्पर्म डोनेट करून 102 मुलांचा पिता बनला होता.
त्याला त्याच्या देशात ब्लॅकलिस्ट करण्यात आल होतं. यामुळे तो परदेशात स्पर्म डोनेट करू लागला. त्याने अनेक डच फर्टिलिटी क्लीनिक्समध्ये, डेनमार्कच्या क्लीनिकमध्ये आणि ऑनलाईन संपर्क करून लोकांना आपले स्पर्म विकले होते. जॉनथनच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की, त्याला फक्त अशा कपलची मदत करायची होती जे कधीही आई-वडील होऊ शकत नव्हते.