नोकिया 3310 मध्ये नवीन फिचर्स, किंमतही खिशाला परवडणारी
By Admin | Published: February 25, 2017 04:56 PM2017-02-25T16:56:04+5:302017-02-25T16:56:04+5:30
नवीन फिचर्ससहीत'नोकिया 3310' हा मोबाइल पुन्हा मार्केटमध्ये येणार आहे. शिवाय, हा फोन सर्वसामान्यांच्या खिशालादेखील परवडणारा आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - नोकिया कंपनी आपला 'नोकिया 3310' हा मोबाइल पुन्हा मार्केटमध्ये आणणार असल्याची बातमी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच मिळाली होती. मात्र या फोनमध्ये ग्राहकांसाठी नवीन फिसर्च असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. शिवाय, हा फोन सर्वसामान्यांच्या खिशालादेखील परवडणारा आहे.
बाजारात येणा-या नोकिया 3310 मोबाइलची किंमत 4,152 रुपये इतकी असणार आहे. शिवाय मोबाईलमध्ये मोनोक्रोम 84X84 डिस्प्ले ब्लॅक अँड व्हाईटऐवजी कलर स्क्रीन असणार आहे. मात्र फोनची बॅटरी आधीप्रमाणचे दीर्घकाळ टिकून राहावी, यासाठी डिस्प्ले अधिक शार्प नसेल.
दरम्यान, नोकिया 3310 हा स्मार्टफोन नसला तरी फीचर फोन असेल, अशी माहिती समोर आली आहे. शिवाय हा फोन विविध रंगांमध्येही उपलब्ध होणार आहे. आधीच्या तुलनेत बाजारात येणार हा फोन आकाराने पातळ आणि वजनाने हलका असेल.
17 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 मध्ये हा मोबाइल पहिल्यांदा भारतात लाँच करण्यात आला होता. त्यावेळी या मोबाइलला ग्राहकांनी पसंती दर्शविली होती. तसेच, मोठ्या प्रमाणात खरेदीसुद्धा केली होती. या महिन्यात 26 फेब्रुवारीला बार्सिलोना येथे होणाऱ्या एका इव्हेंटमध्ये नोकिया कंपनी 'नोकिया 3310' हा मोबाइल पुन्हा लाँच करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नोकिया एकेकाळी मोबाइल प्रॉडक्ट्मधली सर्वात विश्वसनीय कंपनी मानली जायची. मात्र नंतर अनेक मोबाईल कंपन्यांचे स्मार्टफोन्स आले. त्यामुळे नोकियाचे लहान फोन मागे पडले. त्यानंतर नोकियाचे अँड्रॉईड फोनसुद्धा मार्केटमध्ये आले. मात्र, स्मार्टफोन्स वापरणाऱ्या लोकांना पर्याय म्हणून 'नोकिया 3310' हा फोन मार्केटमध्ये आणणार असल्याचे समजते.