या ऐतिहासिक शहरात घर घेण्यासाठी सरकार देत आहे 25 लाख रूपये, तुम्हाला जायचंय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 10:27 AM2022-11-22T10:27:19+5:302022-11-22T10:27:40+5:30
हे शहर आपल्या वास्तुकलेसाठी फेमस आहे. पण लोक हळूहळू इथून जात आहेत. त्यामुळे लोकांना इथे पुन्हा वसवण्याची योजना बनवली गेली आहे.
New settlers Offer: सरकार सुंदर शहरात स्थायीक होण्यासाठी लोकांना 25 लाख रूपये देत आहे आणि ही पूर्ण रक्कम लोकांना नगदी दिली जाईल. ही रक्कम त्यांना दोनदा दिली जाईल. पहिल्या इन्स्टॉलमेंटमध्येच तुम्ही घर खरेदी करू शकता. तेच दुसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही घरातील इतर कामे करू शकता. हे शहर आपल्या वास्तुकलेसाठी फेमस आहे. पण लोक हळूहळू इथून जात आहेत. त्यामुळे लोकांना इथे पुन्हा वसवण्याची योजना बनवली गेली आहे.
या शहरात घर खरेदी करण्याची किंमत साधारण 25 हजार डॉलर आहे. एवढ्या किंमतीत तुम्ही इथे 500 स्क्वेअर फूटाचं घर खरेदी करू शकता. याच्याजवळ सालेंटो शहर आहे. जिथे तुम्हाला स्वच्छ पाणी आणि सांता मारिया डि लेउकाचा समुद्र किनाराही बघायला मिळणार आहे.
असं सांगितलं जात आहे की, इटलीतील हे ऐतिहासिक शहर रिकामं होत आहे. त्यामुळे अशी पॉलिसी बनवली आहे. ज्यात सरकार लोकांना 30,000 यूरो देणार आहेत.
सरकार हे पेमेंट दोन टप्प्यात देणार आहे. पहिली इन्स्टॉलमेंट जुनं घर खरेदी करण्यासाठी मिळेल आणि दुसरी इन्स्टॉलमेंट ते घर तयार करण्यासाठी दिली जाणार आहे. याची माहिती तुम्ही शहराच्या वेबसाइटवर लवकरच बघू शकणार आहात. सध्या या शहरात 9 हजार लोक राहतात.
ही योजना दक्षिण-पूर्व इटलीच्या प्रेसिसे शहरात चालवली जात आहे. येथील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, हे प्राचीन शहर आपल्या सुंदरतेसाठी आणि ऐतिहासिक महत्वासाठी फेमस आहे. पण काही वर्षापासून येथील लोकसंख्या कमी होत आहे. घरं रिकामी झाली आहेत. त्यामुळे इथे लोकांना वसवण्याची योजना बनवण्यात आली आहे.