अॅमेझॉनच्या जंगलात आढळली नवीन आदिवासी जमात, फोटोंमधून खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 02:44 PM2018-08-23T14:44:16+5:302018-08-23T14:53:37+5:30
अॅमेझॉनचं जंगल तुम्ही अनेकदा डिस्कव्हरी चॅनेलवर किंना अनेक हॉलिवूड सिनेमांमध्ये पाहिलं असेल, त्याबाबत खूपकाही ऐकलं असेल.
अॅमेझॉनचं जंगल तुम्ही अनेकदा डिस्कव्हरी चॅनेलवर किंना अनेक हॉलिवूड सिनेमांमध्ये पाहिलं असेल, त्याबाबत खूपकाही ऐकलं असेल. असा क्वचितच एखादा असेल ज्याला हे जंगल माहीत नसेल. हे जंगल जगातल्या सर्वात घनदाट जंगलांपैकी एक आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी या जंगलातील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये काही आदिवासी लोक दिसत आहेत. यात काही असे आदिवासी पाडे आहेत ज्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नाही.
हे फोटो ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत. ब्राजीलची एक सरकारी संस्था FUNAI व्दारे हे फोटो घेण्यात आले आहेत. ही संस्था आदिवासी लोकांचा आणि अॅमेझॉन जंगलाचा अभ्यास करत आहे.
आदिवासी जंगलात आपला जीव वाचवण्यासाठी हत्यारं तयार करतात. हे हत्यारं त्यांना जनावरांपासून वाचवतात. या फोटो हत्यार हे आदिवासी समूहाच्या जवळ मिळालं.
FUNAI चे प्रसिडेंट Wallace Bastos म्हणाले की, या आदिवासी लोकांचं बाहेरील जगाशी काहीही संबंध नाहीये. सरकार गेल्या ३० वर्षांपासून त्यांच्या संरक्षणासाठीही काही करत नाहीये. आता हे फोटो समोर आल्यामुळे कदाचित सरकारला जाग येईल आणि यांच्यासाठी काहीतरी करेल.
या फोटोंना झूम करुन पाहिल्यास आढळले की, या लोकांच्या हातात भाले आहेत आणि ते ड्रोन कॅमेराकडे पाहत आहेत.
खालील व्हिडीओमध्ये एक आदिवासी जंगलात झाड तोडत आहे. पण हा व्हिडीओ जुना आहे. दरम्यान, गेल्यावर्षी गोल्ड माइन्सने याच जंगलातील १० आदिवासींची हत्या केली होती.