NASA च्या शास्त्रज्ञांनी शोधले नवीन जग; कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली सर्वात मोठी घटना...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 07:51 PM2023-10-15T19:51:08+5:302023-10-15T19:51:43+5:30
नासाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून हजारो प्रकाशवर्षे दूर 2 महाकाय ग्रहांची टक्कर कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली आहे.
NASA Discovery News: अमेरिक स्पेस एजन्सी, NASA गेल्या अनेक दशकांपासून अंतराळातील रहस्य शोधण्याचे काम करत आहे. दरम्यान, आता नासाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून सुमारे 3,600 प्रकाशवर्षे दूर असलेल्या दोन महाकाय ग्रहांची टक्कर कॅमेऱ्यात कैद केली आहे. यासाठी त्यांनी अंतराळावर लक्ष ठेवण्यासाठी तयार केलेल्या खास अवकाशयानाचा वापर केला.
या शोधादरम्यान, शास्त्रज्ञांना दोन प्रचंड मोठ्या बर्फाळ ग्रहांची टक्कर झाल्याचे आढळले. परिणाम स्वरुप बाष्पयुक्त खडक आणि पाण्यापासून बनलेला डोनट आकाराचा ढग तयार झालेला दिसला. या दोन ग्रहकांच्या टक्ररमुळे प्रचंड मोठी उर्जा निर्माण झाली आहे. यातून नवीन ग्रह तयार होण्याचा अंदाज आहे.
न्यू सायंटिस्टच्या रिपोर्टनुसार, या घटनेमुळे नवीन जगाचा जन्म आणि ग्रहाच्या निर्मितीची रहस्ये उलगडण्याची सुवर्ण संधी आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या गटाने पृथ्वीपासून 3,600 प्रकाशवर्षे दूर असलेल्या, ASASSN-21 qj नावाच्या ताऱ्याचा अभ्यास सुरू केला होता. या घटनेनंतर शास्त्रज्ञांची उत्सुकता वाढली आहे. दोन वर्षे केलेल्या अभ्यासाचा अहवाल 11 ऑक्टोबर रोजी नेचर मासिकात प्रकाशित झाला.