New Year 2021 : माहामारीची भविष्यवाणी करणाऱ्या बिल गेट्स यांनीच सांगितलं; कसं असेल नववर्ष २०२१

By manali.bagul | Published: December 31, 2020 04:01 PM2020-12-31T16:01:28+5:302020-12-31T16:10:48+5:30

New Year 2021 :पुढील वर्ष सकारात्मक होण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे मास्क, सोशल डिस्टेंसिंग आणि इतर प्रयत्नांमुळे विषाणूचा फैलाव होण्याचा धोका कमी होईल आणि लसीच्या परिणामामुळे येत्या काही महिन्यांत जागतिक स्तरावर बदल दिसून येतील

New Year 2021: Bill gates is hopeful for the next year and says we have to be careful about new corona strain | New Year 2021 : माहामारीची भविष्यवाणी करणाऱ्या बिल गेट्स यांनीच सांगितलं; कसं असेल नववर्ष २०२१

New Year 2021 : माहामारीची भविष्यवाणी करणाऱ्या बिल गेट्स यांनीच सांगितलं; कसं असेल नववर्ष २०२१

Next

प्रसिद्ध उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी कोरोना साथीच्या आजाराशी लढणार्‍या जगाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. बिल गेट्स यांनी कोरोनाविषयी सतर्क राहण्याचा सल्ला दिला. तसेच व्हायरस विरूद्ध  लढण्यासाठी 2021 साठी अपेक्षा वाढवणारा असेल. असा विश्वास त्यांना आहे. येत्या काळात गोष्टी सामान्य होऊ शकतात. गेट्स यांनी आपल्या ब्लॉगच्या नवीन पोस्टमध्ये हे वर्ष शोकांतिका असल्याचे वर्णन केले आहे.

गेट्स यांनी लिहिलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले की 2021 हे सहज सोपे वर्ष असणार नाही. संगणकाच्या मॉडेल्सनुसार कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे 2021 चा पहिला महिना खूपच कठीण असू शकतो आणि म्हणूनच या नवीन स्ट्रेनला लवकर नियंत्रित करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान ते २०२१ बद्दल देखील सकारात्मक आहे.

गेट्सने लिहिले  आहे की, ''पुढील वर्ष सकारात्मक होण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे मास्क, सोशल डिस्टेंसिंग आणि इतर प्रयत्नांमुळे विषाणूचा फैलाव होण्याचा धोका कमी होईल आणि लसीच्या परिणामामुळे येत्या काही महिन्यांत जागतिक स्तरावर बदल दिसून येतील.'' या विषयी सांगताना त्यांनी जगभरातील शास्त्रज्ञांचे आभार मानले आहेत. कारण कोरोनाविरूद्धच्या लढाईत फायझर, मॉर्डेना आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेकासारख्या लसींना यश मिळाले आहे.''

बिल गेट्स

ते म्हणाले की, ''जागतिक पातळीवर होत असलेल्या सहकार्यामुळे  2021 बाबत मी थोडासा सकारात्मक आहे. मला असे वाटते की जगाने केवळ साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्याची गरज नाही तर आपल्या काळाची सर्वात कठीण समस्या म्हणजे हवामान बदलाच्या दिशेने आवश्यक पावले उचलणे देखील आवश्यक आहे. ''

2018 च्या सुरुवातीला बिल गेट्सने साथीच्या रोगाविषयी चर्चेत म्हटले होते की, ''लवकरच जगाला साथीच्या रोगाचा सामना करावा लागू शकतो. ''अमेरिकन शहरातील वैद्यकीय संस्था आणि इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या वतीने आयोजित या सभेत बिल गेट्स म्हणाले की, ''येत्या काळात साथीच्या रोगाला रोखण्यासाठी युद्धपातळीवर तयारी करावी लागेल अन्यथा सहा महिन्यांत या साथीच्या रोगांमुळे 30 दशलक्ष लोकांना मृत्यूचा सामना करावा  लागू शकतो.''

Web Title: New Year 2021: Bill gates is hopeful for the next year and says we have to be careful about new corona strain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.