नवे वर्ष धोक्याचे! ट्रम्प, पुतीन यांच्या जीवाला धोका; प्रसिद्ध बाबा वांगाची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 01:30 PM2019-12-27T13:30:46+5:302019-12-27T13:41:38+5:30

वांगा यांना नॉस्ट्रेदामस या प्रसिद्ध भविष्यवेत्याचा वारसदार समजले जाते.

New Year is danger! Threat to Trump, Putin's Life; Prophecy of the famous Baba Wanga | नवे वर्ष धोक्याचे! ट्रम्प, पुतीन यांच्या जीवाला धोका; प्रसिद्ध बाबा वांगाची भविष्यवाणी

नवे वर्ष धोक्याचे! ट्रम्प, पुतीन यांच्या जीवाला धोका; प्रसिद्ध बाबा वांगाची भविष्यवाणी

Next

येणारे नवे वर्ष जगासमोर नवीन आव्हाने, नवीन समस्या घेऊन येणारे आहे. दोन मोठ्या देशांच्या प्रमुखांच्या जीवाला धोका असल्याची भविष्यवाणी बुल्गेरियाच्या बाबा वांगा हिने काही दशकांपूर्वीच केली आहे. 


वांगा हिने 9/11 चा दहशतवादी हल्ला, बराक ओबामा राष्ट्रपती होणार यावर भविष्यवाणी केल्याचे सांगितले जाते. या दोन भविष्यवाणींप्रमाणे 2020 मधील तिच्या भविष्यवाणी खरी ठरली तर अमेरिका, युरोप, रशियावर मोठे संकट ओढवणार आहे. 


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या महाभियोगाच्या संकटात आहेत. त्यांना पुढच्या वर्षी गंभीर आजार होणार असून यामुळे ते बहीरे होतील असे म्हटले आहे. अमेरिकेच्या 45 व्या राष्ट्रपतींना ऐकायला न येणे आणि ब्रेन ट्युमरसारखा गंभीर आजार होईल. हा आजार क्य़ुबामध्ये काही अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना झालेला तसाच असणार असल्याचे बोलले जात आहे. 


तर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांच्यावर जीवघेणा हल्ला होणार असून त्यांची हत्या केली जाणार आहे. हा हल्लेखोर त्यांच्याच सुरक्षेसाठी तैनात असलेला अधिकारी असणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पुतीन यांनी त्यांच्यावर याआधी चारवेळा हत्येसाठी प्रयत्न झाल्याचे म्हटले होते. 
वांगा यांना नॉस्ट्रेदामस या प्रसिद्ध भविष्यवेत्याचा वारसदार समजले जाते. वांगा यांचा मृत्यू 1996 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी झाला होता. त्यांचे डोळे त्या 12 वर्षांच्या असताना एका रहस्यमय घटनेवेळी गेल्याचे सांगितले जात होते.

 
वांगा यांच्या याआधी काही भविष्यवाणी खोट्याही ठरलेल्या आहेत. मुस्लिम संघटनांकडून युरोपवर रासायनिक हल्ला होणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, अद्याप युरोपवर असा कोणताही हल्ला झालेला नाही. त्यांनी सांगितलेले की 2016 मध्ये युरोप नष्ट होईल.


 

Web Title: New Year is danger! Threat to Trump, Putin's Life; Prophecy of the famous Baba Wanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.