New Year's Eve Party at Home : थर्टी फर्स्ट इन्जॉय करण्यासाठी बाहेर कशाला जायचं? नववर्षाच्या स्वागतासाठी घरीच 'असं' करा सेलिब्रेशन!
By Manali.bagul | Published: December 31, 2020 12:48 PM2020-12-31T12:48:50+5:302020-12-31T13:05:21+5:30
Happy New Year 2021: घराबाहेर पडतानाही मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टेंसिंग या सगळ्याचा विचार करावा लागणार आहे. त्यापेक्षा घरच्याघरी थर्टी फर्स्ट साजरा केला तर संसर्गाचं किंवा जास्त खर्चाचं टेंशन येणारच नाही.
डिसेंबरचा शेवटचा आठवडा म्हणजे मौज मजा आणि फक्त इन्जॉय. कारण वर्षाच्या शेवटी ख्रिसमसचा, थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी लोकांमध्ये उत्साह असतो. पण यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळे लोक जास्त घराबाहेर पडता येणार नाही. संचारबंदी आणि कोरोना संसर्गाची भीती अनेकांच्या मनात आहे. हॉटेल्स, मॉल्स अशा सार्वजनिक ठिकाणी संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे घराबाहेर पडतानाही मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टेंसिंग या सगळ्याचा विचार करावा लागणार आहे. त्यापेक्षा घरच्याघरी थर्टी फर्स्ट साजरा केला तर संसर्गाचं किंवा जास्त खर्चाचं टेंशन येणारच नाही. आम्ही तुम्हाला घरच्या घरी थर्टी फर्स्ट इन्जॉय करण्यासाठी काही आयडिया सांगणार आहोत.
डान्स करणं
घरच्याघरी नातेवाईकांसोबत किंवा एखादी मैत्रिण-मित्र यांच्यासोबत तुम्ही आपल्या आवडत्या गाण्यांवर डान्स करून थर्टीफर्स्टचा आनंद घेऊ शकता. डान्स केल्यानं तुमचा सगळा कंटाळा निघून जाईल. त्यामुळे तुम्हाला आनंदी आणि फ्रेश वाटेल.
जेवणाचा बेत
काहींसाठी थर्टी फर्स्ट म्हणजे मांसाहारी जेवणावर छान ताव मारणे असा आहे. म्हणून तुम्ही छान जेवणाचा बेत आखून मांसाहारी आणि शाकाहारी असे दोन्ही पद्धतीने जेवण बनवू शकता. कारण आज गुरूवार असल्यामुळे अनेकजण नॉन व्हेज खाणं टाळतील. या ऐवजी तुम्ही पनीरच्या काही डिशेज, पाव भाजी, मिसळ, चायनिज त्याचप्रमाणे काहीतरी गोड पदार्थ तयार करून किंवा बाहेरून केक आणून थर्टी फस्ट साजरा करू शकता.
पत्ते खेळणं
पत्ते खेळणं लोकांना खूप आवडतं. त्यामुळे तुम्हीसुद्धा चांगला वेळ जाण्यासाठी पत्ते खेळू शकता. त्याचबरोबर महिलांना देखील किटी पार्टीप्रमाणे घरी खेळता येणारे इनडोअर गेम्स खेळू शकता. कॅरम, संगीत खुर्ची असे खेळ खेळल्यानं तुमचा वेळ छान जाईल आणि खूप इन्जॉय करता येईल. Happy New Year 2021 Wishes : नवे वर्ष, नवे पर्व; नातेवाईक, मित्रमैत्रिणींसह प्रियजनांना ;'अशा' द्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा
अंताक्षरी
अंताक्षरी हा सगळ्यांचा आवडता कार्यक्रम आहे. सध्या मोबाईलचा वापर वाढल्यामुळे अंताक्षरी खेळण्याचा प्रकार कमी झालेला आहे. थर्टी फस्टच्या निमित्ताने तुम्ही पुन्हा हा अंताक्षरी खेळू शकता. त्याचबरोबर गाण्यांचा कंटाळा आला असेल तर दमशेराज हा खेळ देखील खेळू शकता. कोरोना काळात सामाजिक स्थितीचे भान राखून नागरिकांनी देखील सरकारच्या नियमांचे पालन करत घरच्याघरी न्य़ू ईअरचे सेलिब्रेशन करायला हवे. जेणेकरून सेलिब्रेशनही होईल आणि संसर्ग वाढण्याची भीतीसुद्धा नसेल. ७ वर्षाचा असूनही विमान उडवतो हा मुलगा, जगभरातील लोक झाले हैराण....