कंट्रोल टॉवरमध्ये शारीरिक संबंध ठेवत होता एअर ट्रॅफिक कंट्रोलर, कोर्ट म्हणालं - हे इतकही रिस्की नव्हतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 11:35 AM2022-03-30T11:35:16+5:302022-03-30T11:35:38+5:30

New Zealand : ड्युटी दरम्यान तो टॉवरवर शारीरिक संबंध ठेवत होता. हेही समोर आलं की, शारीरिक संबंध ठेवता ठेवता तो पायलट्सना निर्देशही देत होता.

New Zealand air traffic controller make out on duty gets license back | कंट्रोल टॉवरमध्ये शारीरिक संबंध ठेवत होता एअर ट्रॅफिक कंट्रोलर, कोर्ट म्हणालं - हे इतकही रिस्की नव्हतं!

कंट्रोल टॉवरमध्ये शारीरिक संबंध ठेवत होता एअर ट्रॅफिक कंट्रोलर, कोर्ट म्हणालं - हे इतकही रिस्की नव्हतं!

Next

New Zealand : कधी कधी काही लोक ड्युटीवर असताना असे काही कारनामे करतात की, त्यांना ते नंतर चांगलेच महागात पडतात. असाच एक एअर ट्रॅफिक कंट्रोलरचा कारनामा समोर आला आहे. त्याच्यावर आरोप आहे की, ड्युटी दरम्यान तो टॉवरवर शारीरिक संबंध ठेवत होता. हेही समोर आलं की, शारीरिक संबंध ठेवता ठेवता तो पायलट्सना निर्देशही देत होता.

ही घटना न्यूझीलॅंडची असून या एअर ट्रॅफिक कंट्रोलरचं लायसन्स जप्त करण्यात आलं होतं. मात्र, आता त्याला लायसन्स परत देण्यात आलं आहे. एजजेड हेराल्डच्या वृत्तानुसार, डायरेक्टर द सिविल एविएशन अथॉरटीने या व्यक्तीचं एअर ट्रॅफिक कंट्रोलचं लायसन्स रद्द केलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. त्याच्यावर आरोप होते की, ही व्यक्ती एका विवाहित महिलेसोबत कंट्रोल टॉवरमध्ये शारीरिक संबंध ठेवत होता.

याप्रकरणी न्यायाधीशांनी निर्णय दिला तो या व्यक्तीच्या बाजूने दिला. ते म्हणाले की, ड्युटी दरम्यान शारीरिक संबंध ठेवणं तेवढं रिस्की नव्हतं जेवढं डायरेक्टर वाटत आहे. न्यायाधीश क्रिस तुहो यांनी याप्रकरणी वेलिंगटन डिस्ट्रिक्ट कोर्टात डिसेंबर २०२१ मध्ये दिवस या केसची सुनावणी केली होती. ते म्हणाले होते की, याप्रकरणी पुरेसे पुरावे नाहीत असं त्यांना वाटतं. अशात डायरेक्टर ऑफ द सिविल एविएशन अथॉरटीचा निर्णय त्यांनी रद्द केला.

दरम्यान, महिला आणि पुरूष दोघेही वेगवेगळ्या व्यक्तींसोबत लग्न झालेलं आहे. दोघांची भेट एका डेटिंग वेबसाइटवर झाली होती. रिपोर्टनुसार, दोघेही कुणाचीही पर्वा न करता हॉटेल, मॉटेलमध्ये भेटत राहिले. या दोघांनी त्यांच्या एका सेक्शुअल अॅक्टिविटीचा व्हिडीओ शेअर केला होता. पण यादरम्यान या महिलेने एअऱ ट्रॅफिक कंट्रोल टॉवरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला मेसेज करून अफेअरबाबत सांगितलं होतं. ज्यानंतर दोघांचं लग्न मोडलं होतं. 

एअर ट्रॅफिक कंट्रोलरचं लायसन्स डिसेंबर २०१८ मध्ये कॅन्सल केलं होतं. फेब्रुवारी २०१९ मध्ये व्यक्तीने हे मान्य केलं होतं की, त्याचं या महिलेसोबत अफेअर होतं. पण व्यक्तीने कंट्रोल टॉवरमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची बाब नाकारली होती. एअर ट्रॅफिक कंट्रोलरने असाही आरोप लावला की महिला त्याला ब्लॅकमेल करत होती. ती त्याच्याकडे ३८ लाख रूपयांची मागणी करत होती. 
 

Web Title: New Zealand air traffic controller make out on duty gets license back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.