महिला मंत्री देत होत्या मुलाखत, मुलानं कॅमेऱ्यासमोर दाखवलं गाजर, VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 11:20 AM2021-09-01T11:20:24+5:302021-09-01T11:22:30+5:30

new zealand minister carmel sepuloni interview : सामाजिक विकास मंत्री कार्मेल सेपुलोनी यांची रेडिओ सामोआसोबत एक लाईव्ह झूम मुलाखत सुरू होती.

new zealand minister carmel sepuloni interview son waving phallic carrot | महिला मंत्री देत होत्या मुलाखत, मुलानं कॅमेऱ्यासमोर दाखवलं गाजर, VIDEO व्हायरल

महिला मंत्री देत होत्या मुलाखत, मुलानं कॅमेऱ्यासमोर दाखवलं गाजर, VIDEO व्हायरल

googlenewsNext

सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ न्यूझीलंडच्या सामाजिक विकास मंत्री कार्मेल सेपुलोनी यांचा आहे. दरम्यान, कार्मेल सेपुलोनी एक मुलाखत देत असताना त्यांचा मुलगा खोलीत आला आणि तो गाजर दाखवू लागला. यावेळी कार्मेल सेपुलोनी यांनी आपल्या मुलाला गाजर दाखवण्यापासून रोखले, पण तरीही तो गाजर दाखवण्यास इच्छुक असल्याचे दिसून आले.

सामाजिक विकास मंत्री कार्मेल सेपुलोनी यांची रेडिओ सामोआसोबत एक लाईव्ह झूम मुलाखत सुरू होती. यावेळी त्यांचा धाकटा मुलगा किराणा मालात आढळलेले विचित्र दिसणारे असे गाजर दाखवण्यासाठी उत्साहाने खोलीत आला. यावेळी मंत्री कार्मेल सेपुलोनी त्याला सारखं-सारखं थांबवत होत्या, तरीही तो मुलाखतीदरम्यान कॅमेऱ्यासमोर गाजर दाखवायला लागला.

हा व्हिडिओ नेटिझन्सनी ७० हजारहून अधिक वेळा पाहिला आहे. दरम्यान, आपला मुलगा खोलीत आला, त्यावेळी मंत्री कार्मेल सेपुलोनी यांनी घाईघाईने यजमानांची माफी मागितली आणि म्हणाल्या,'एक सेकंद थांबा, माझा मुलगा खोलीत आहे.' दरम्यान, त्यांचा मुलगा हसत गाजर दाखवत होता. त्यानंतर कार्मेल सेपुलोनी यांनी त्याच्याकडून गाजर हिसकावण्याचा प्रयत्न केला. नंतर मुलगा खोलीतून बाहेर गेला.

कार्मेल सेपुलोनी यांनी मुलाकडून गाजर काढून घेतले, त्यावेळी त्यांनी मुलाला सांगितले की, 'मी मुलाखत घेत आहे आणि मी ऑनलाइन आहे,' त्यानंतर त्यांच्या मुलाने उत्तर दिले, 'ओह'. यानंतर कार्मेल सेपुलोनी यांनी  ट्विटरवर या मजेशीर घटनेचा उल्लेख करत म्हटले की, मुलाखतीवेळी मुलाने गाजर दाखवल्यामुळे थोडा अपमान झाल्यासारखे वाटले. मात्र आता या घटनेवर हसणे थांबवू शकत नाही.


Web Title: new zealand minister carmel sepuloni interview son waving phallic carrot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.