पतीच्या 'या' सवयीमुळे वैतागली होती पत्नी, रागाच्या भरात ऑनलाइन विकला पती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 12:08 PM2022-01-19T12:08:35+5:302022-01-19T12:09:02+5:30
Wife Sales Husband : न्यूझीलॅंडच्या राहणाऱ्या एका महिलेने रागाच्या भरात आपल्या पतीलाच विकलं. महिलेने आपल्या पतीला विकण्यासाठी ऑनलाइन बोली लावली.
घरातील वयोवृद्ध लोक आपल्याला नेहमीच सांगतात की, राग हा माणसाचा वैरी आहे. रागाच्या भरात माणसाच्या हातून काहीही चुकीचं घडू शकतं. असंच काहीचं रागात असलेल्या एका पत्नीने केलं. न्यूझीलॅंडच्या राहणाऱ्या एका महिलेने रागाच्या भरात आपल्या पतीलाच विकलं. महिलेने आपल्या पतीला विकण्यासाठी ऑनलाइन बोली लावली.
'द मिरर'च्या वृत्तानुसार, न्यूझीलॅंडच्या एका व्यक्तीला फिरण्याची फार सवय होती. तो नेहमीच आपल्या बायको-मुलांना सोडून फिरायला जात होता. यावेळीही त्याने तसंच केलं तर पत्नी संतापली. त्यानंतर पत्नीने तिच्या पतीला विकण्यासाठी ऑनलाइन बोली लावली. पत्नी जाहिरात तयार करून पतीची सेलिंग प्रोफाइल तयार केलं आणि मग ते ट्रेडिंग साइटवर टाकलं.
पतीच्या फिरण्याच्या सवयीने वैतागली होती महिला
या महिलेचं नाव लिंडा मॅकएलिस्टर आहे. रिपोर्टनुसार, महिला तिच्या पतीच्या फिरण्याच्या सवयीला फारच वैतागली होती. यानंतर तिने हे धक्कादायक पाउल उचललं. यावेळी जेव्हा पती फिरायला गेला तेव्हा पत्नीने त्याला विकण्याचा प्लान केला. तिने त्याचं प्रोफाइल तयार केलं आणि त्यावर त्याचा फोटो लावला.
रिपोर्टनुसार, महिलेने जॉन मॅकएलिस्टर नावाच्या आपल्या पतीसाठी असं केलं, कारण तिच्या मुलांना सुट्टी होती. पतीने मुलांना सांभाळायचं होतं. ते करायचं सोडून तो फिरायला निघून गेला. महिलेनुसार, पतीला फिरणं इतकं पसंत आहे की, तो काही न सांगताच निघून जातो.
महिलेने सांगितलं 'प्रॉडक्ट'ची खासियत
रिपोर्टनुसार, दोघांचं लग्न २०१९ मध्ये झालं होतं. लग्नानंतर या कपलला दोन मुलं झालीत. महिलेने सांगितलं की, तिच्या पतीला पत्नीची ही जाहिरात फारच मजेदार वाटली. महिलेने पती विकणाऱ्या जाहिरातीत लिहिलं की, Husband for Sale. यात तिने पतीची खासियतही सांगितली. महिलेने लिहिलं की, '६ फूट १ इंच उंची, वय ३७ वर्ष, व्यवसाय शेती. विकण्यासाठी तयार'. महिलेने सांगितलं की, चांगल्या प्रकारे खाऊ-पिऊ घातल्यावर तो ईमानदार बनला आणि त्याची कंडीशन वापरलेली आहे. महिलेने हेही सांगितलं की, जर कुणाला याला विकत घ्यायचं असेल तर फ्री शिपिंग दिली जाईल.
हे पण वाचा :
अविश्वसनीय....महाराष्ट्रातील 'हा' जिल्हा १९४७ आधीच ३ दिवसांआधीच स्वतंत्र झाला होता!