एअरपोर्टवर सोडलं नाही म्हणून तरूणीने बॉयफ्रेंडला खेचलं कोर्टात, वाचा कोर्टाने काय दिला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 10:30 AM2024-06-24T10:30:18+5:302024-06-24T10:32:40+5:30
तरूणीचा आरोप आहे की, बॉयफ्रेंडने प्रॉमिस केसं होतं की, तो तिला एअरपोर्टवर नेऊन सोडेल. पण असं त्याने केलं नाही.
रिलेशनशिप टिकवणं हे फारच अवघड काम असतं. कारण यात एकमेकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करावी लागतात. सोबत घेतलेल्या शपथा पूर्ण कराव्या लागतात आणि एकमेकांची काळजीही घ्यावी लागते. जर तुम्ही एखादं वचन दिलं असेल आणि ते पूर्ण झालं नाही तर समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू शकतं. यामुळे तुमच्यात वादही होऊ शकतात. असंच काहीसं एका तरूणीसोबत झालं. न्यूझीलॅंडची राहणाऱ्या तरूणीने भांडणानंतर तिच्या बॉयफ्रेंडवर केस दाखल केली आहे.
तरूणीचा आरोप आहे की, बॉयफ्रेंडने प्रॉमिस केसं होतं की, तो तिला एअरपोर्टवर नेऊन सोडेल. पण असं त्याने केलं नाही. ती म्हणाली की, ती वेळेला आणि केलेल्या आश्वासनाला खूप महत्व देते. द गार्जियनच्या रिपोर्टनुसार, न्यूझीलॅंडमधील तरूणीने तिच्यासोबत बऱ्याच वर्षापासून असलेल्या बॉयफ्रेंडवर 'वर्बल कॉन्ट्रॅक्ट'चं उल्लंघन केल्याबाबत कोर्टात केस केली आहे. ती म्हणाली की, एअरपोर्टवर न पोहोचल्याने तिची म्युझिक कॉन्सर्टची फ्लाइट सुटली. तिला एक दिवस उशीराने जावं लागलं. तरूणीने सांगितलं की, ती या तरूणासोबत साडे सहा वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहे.
तरूणीचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. ती म्हणाली की, बॉयफ्रेंडने तिला एअरपोर्टवर सोडणं अपेक्षित होतं आणि नंतर दोन श्वानांची देखरेख करण्यासाठी त्याने घरी थांबणं अपेक्षित होतं. तिने त्याला एक दिवसआधीच मेसेज केला होता. पण त्याने मेसेजचा रिप्लाय नाही दिला. ज्यामुळे तिला ट्रीप कॅन्सल करावी लागली. नंतर पुन्हा तिकीट करण्यासाठी तिला जास्त पैसे खर्च करावे लागले. हे सगळं त्याने दिलेला शब्द न पाळल्यामुळे झालं. कोर्टाने आता यावर निर्णय दिला की, तुम्ही असं कुणावरही दिलेला शब्द पाळण्यासाठी दबाव टाकू शकता नाही. खासकरून तेव्हा जेव्हा तुमचं नातं कायदेशीररित्या ठरलेलं नसतं.